शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांच्या हातात नाडी

By admin | Updated: May 29, 2016 00:43 IST

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ग्रामीण रूग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हाती आहे.

आसगाव : ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून ग्रामीण रूग्णांची नाडी बोगस डॉक्टरांच्या हाती आहे. यातून रूग्णांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असल्याने बोगस डॉक्टरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.ग्रामीण भागातील गोरगरीब व अशिक्षित रूग्णांना घरपोच आरोग्य सेवा देण्याकडे काही बोगस डॉक्टरांचा कल दिसून येतो. आधी गावातील प्रतिष्ठितांचा विश्वास संपादन करून नंतर मात्र आपली दुकानदारी चालविण्यावर या डॉक्टरांचा भर आहे. एखाद्याने या बाबत विरोध केल्यास त्याच गावातील इतर लोकांकडून अशा व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची योजनाही बोगस डॉक्टरांची असते. त्यामुळे कुणी विरोध करण्यास सहजासहजी पुढे येत नाही. नागरिकांना उपचारासाठी पवनी येथील ग्रामीण रूग्णालयात यावे लागते. अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. हा खर्च प्रत्येकालाच शक्य होत नसल्याने स्थानिक पातळीवरील डॉक्टरांकडून उपचार घेण्यावर नागरिक भर देतात. परंतु हे डॉक्टर किती खरे व किती खोटे याची माहिती कुणालाही नसते. परिस्थितीनुसारच डॉक्टर रूग्णांवर उपचार करून पैसे कमवितात. ग्रामीण भागातील बहुतांश रूग्ण हे अशिक्षित असतात. डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी एखादे इंजेक्शन लावले, गोळ्या दिले की अशा रुग्णांचे मानसिक समाधान होते. यातून बऱ्याचदा अनेकांचा आजारही दूर होतो. अशाच मानसिकतेचा बोगस डॉक्टर लाभ उचलतात. अनेकांनी तालुक्यात विविध ठिकाणी आपले दवाखाने थाटले असून त्याद्वारे ते रूग्णांवर उपचार करतात. मात्र, या बोगस डॉक्टरांमुळे ग्रामीण रूग्णांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांवर कारवाईची मागणी होत आहे. (वार्ताहर)