शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आता पंतप्रधान आवास योजना

By admin | Updated: May 31, 2016 00:44 IST

केंद्रात भाजपाप्रणीत सत्ता आल्याने योजनांची नावे बदलून नव्याने योजना सुरू करण्याचा धडाकाच सुरू आहे.

१३ अटींमुळे योजनेपुढे आव्हाने : नव्या निकषानुसार होणार अंमलबजावणीतुमसर : केंद्रात भाजपाप्रणीत सत्ता आल्याने योजनांची नावे बदलून नव्याने योजना सुरू करण्याचा धडाकाच सुरू आहे. त्यात इंदिरा आवास योजनेचेही नाव बदलले जात असून पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या नावाने ही योजना नव्या निकषांसह येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील काही गावांची पथदर्शी निवड केली आहे. भाजप सरकारने सर्वांसाठी घर याप्रमाणे सन २०२२ पर्यत एक कोटी घरे देण्याची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत विविध योजनांतून घर बांधणीसाठी अनुदान देण्याचा कार्यक्रम केंद्र व राज्य सरकारने हाती घेतले आहेत. पूर्वीच्या सरकारच्या इंदिरा आवास योजनेचे नाव व निकषात बदल करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) असे योजनेचे नाव केले आहे. २०११ मध्ये झालेल्या सामाजिक , आर्थिक व जातिनिहाय सर्वेक्षणामधून लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांमधील सुमारे १० गावांची पथदश्री निवड केली आहे. त्यामध्ये बेघर भिक्षेवर गृहातील बेघर, हाताने मैला उचलणारे, आदिम जमाती काद्याने बंदमुक्त केलेले वेठबिगार यांना प्राधान्य मिळेल. विशेष घरांच्या कामांची गुणवत्ता तपासणी जाणार आहे. सुमारे दीड लाख रूपयांचे अनुदान त्यासाठी मिळणार आहे. योजनेत १३ अटी असून त्यात घरात फ्रिज, लॅडलाईन नसावा ही अट असलयने अनेकांना योजनेचा लाभ मिळणार नाही अशी स्थिती आहे.यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनेत शासनाने बदल केला आहे. नव्या पंतप्रधान आवास योजनेत लाभार्थ्यांना कशाप्रकारे अर्ज करायचे आहेत यासाठी शासनाने घालून दिलेले नवीन १३ निकष याची इत्थंभूत माहिती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. इंदिरा आवास योजनेसाठी शासनाने ज्या अटी व शर्ती लागू केल्या होत्या त्यापैकी बऱ्याच नवीन अटी व शर्ती या घरकूल योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शासनाने पंतप्रधान आवास योजनेसाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला घरकुलाचे उद्दीष्ट ठरवून दिले आहे. त्यानुसार या योजनेची अंमलबजावणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड करताना नवीन अटी व शर्तीची पूर्तता करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)