आता परसोडीत मिळणार शुद्ध पाणी

By Admin | Updated: September 25, 2016 00:50 IST2016-09-25T00:50:00+5:302016-09-25T00:50:00+5:30

शुद्ध पाण्यासाठी परसोडीवाशीय वनवन भटकत होते. याची दखल स्थानिक शासनकर्त्यांनी घेतली.

Now the Parasodita will get pure water | आता परसोडीत मिळणार शुद्ध पाणी

आता परसोडीत मिळणार शुद्ध पाणी

समस्या लागली मार्गी : नऊ लाख रूपयांचे संयंत्र बसविले
जवाहरनगर : शुद्ध पाण्यासाठी परसोडीवाशीय वनवन भटकत होते. याची दखल स्थानिक शासनकर्त्यांनी घेतली. त्यानुसार गावातच शुद्ध पाण्याचे नियोजन करून आरो प्रणाली प्रकल्पांतर्गत एटीएम उभारण्यात आले आहे. याद्वारे आता नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.
चौदाव्या वित्त आयोगाद्वारे आरोप्रणाली प्रकल्प अंतर्गत सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत परसोडी जवाहरनगर येथे नऊ लक्ष किंमतीची महत्वाकांक्षी शुद्ध पेयजल आरो उभारण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन सरपंच पंकज सुखदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच दर्शन फंदे, जिजा बावनकुळे, पप्पु थापा, कौशल्या हटवार, कुंदा हटवार, कल्पना मोटघरे, नाना हटवार, प्रणाली चव्हाण, कुलदीप कावळे, श्यामकला चकोले, ग्रामविकास अधिकारी के.डी. नागपुरे, रोहित भोंगाडे, बाला वाडीभस्मे उपस्थित होते. या आरोप्रणाली योजने अंतर्गत ग्रामस्थांना एक एटीएम वितरीत करण्यात येणार आहे. हे कार्ड एटीएम मशिनला योग्य स्थळी स्पर्श केल्यास एकदा २० लीटर पाणी मिळणार आहे. या कार्डचे वितरण ग्रामपंचायत कार्यालय लगत एटीएम कार्यालयातून करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार एटीएम कार्ड देण्यात येईल. संचालन व आभार के.डी. नागपुरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Now the Parasodita will get pure water