शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रामपंचायत सरपंचही कर्मचारी कक्षेत!

By admin | Updated: February 29, 2016 00:17 IST

शिर्षक वाचून दचकलात... पण, हे सत्य आहे. ग्रामपंचायतचा सरपंच आता कर्मचारी या व्याख्येच्या कक्षेत येतो.

मोहाडी पंचायत समितीने लावला जावईशोध : संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणारराजू बांते मोहाडीशिर्षक वाचून दचकलात... पण, हे सत्य आहे. ग्रामपंचायतचा सरपंच आता कर्मचारी या व्याख्येच्या कक्षेत येतो. अशा प्रकारचा नवीन शोध मोहाडी पंचायत समितीने लावला ंअसल्याचा अजब कारभार उजेडात आला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कान्हळगाव / सिरसोली येथील नाला सरळीकरण व पांदन रस्त्याचे काम न होता बनावट हजेरीपट दाखवून पैसा हडपला याबाबत लोकमतने विषय लावून धरला. पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याद्वारे विविध स्तरावर चौकशी करण्यात आल्या. सदर प्रकरणात ग्रामरोजगारसेवक, दोन पॅनेल तांत्रिक अधिकारी (कंत्राटी) आणि नियमित संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त नागपूर व जिल्हाधिकारी भंडारा यांच्या पत्रांचा संदर्भा देऊन सर्वांवर शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करावी असे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती मोहाडी यांना दिले. या पत्रानुसार गटविकास अधिकारी, मोहाडी यांनी सरपंच अनुप उताणे यांना ४१ हजार ८०८ रुपये वित्त विभाग पंचायत समिती मोहाडी येथे रोखीने न भरल्यास कारवाईस पात्र राहाल, असे निर्देश दिले.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त सर्व पत्रामध्ये कुठेही पदाधिकारी असा उल्लेख नाही. पण, राजकीय दबावाखाली कक्ष अधिकारी एल.जे. कुंभरे, गटविकास अधिकारी यांनी माजी सरपंच अनुप उताने यांचेवर वसुलीची रक्कम पंचायत समिती मोहाडी येथील वित्त विभागात जमा करण्याबाबत पत्र बजावले आहे. या पत्रावरून संबंधित अधिकारी व कर्मचारी याचा चुकीचा अर्थप्रयोग लावला. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचीचे सरपंचही अधिकारी व कर्मचारी यांच्या कक्षेत येतात असा जावईशोध पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. या नवीन प्रकारामुळे सरपंच पदाधिकारी या कक्षेत येत असताना कर्मचारी असल्याचा नवीन शोध लावला गेला आहे. विभागीय उपआयुक्त (रोहयो) नागपूर विभागाच्या पत्रानुसार मग्रारोहयो अंतर्गत नाला सरळीकरण व पांदन रस्त्याच्या कामात बोगस मजुरांचे नाव दाखवून भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात केवळ ग्रामरोजगार सेवक यांचेकडून संपूर्ण रकमेची वसुली प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र ३० डिसेंबर २०१५ रोजी उपआयुक्त (रोहयो) नागपूर विभागाच्या पथकाने संबंधित बोगस कामाची पाहणी प्रत्यक्ष कान्हळगाव येथे येऊन केली होती. या प्रकरणात स्पष्टपणे कोणावर जबाबदारी निश्चित करावी यांचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. सदर कामासाठी ग्रामरोजगार सेवक यांच्यावर ६० टक्के, तांत्रिक पॅनल अधिकारी यांचेवर ४० टक्के अशी जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सदर प्रकरणी दोन्ही कामावर त्या कालावधीत काढलेल्या हजेरी पत्रकाप्रमाणे काढलेली मजुरीप्रमाणे एकमुश्त वसुली करण्यात यावी असे निर्देश उपआयुक्त रोहयो यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. तथापि या प्रकरणात अपहारित रकमेची वसुली करणे, चौकशी अहवालातील मुद्यानुसार दोषीविरुद्ध शिस्तभंग विषयक कारवाी व गुन्हा नोंदविण्याची कठोर कारवाई करावी आणि संबंधित कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित करून नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाई करावी व पूर्तता अहवाल १५ दिवसाच्या आत पाठविण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.गोपनीय आहे..कान्हळगाव येथील रोहयोच्या कामात काय झाले याबाबत विस्तारीत सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. गोपनीयता असल्याचे सांगून चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत असल्याचे तसेच जाणिवपूर्वक काही दडवून ठेवण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. अफरातफर वसुलीसंबंधिची कारवाई करण्यात आली आहे. सरपंचास वसुलीची रक्कम भरण्याबाबतचे पत्र मागे घेण्यात येणार आहे.- पंकज भोयर, खंडविकास अधिकारी मोहाडी.सदर काम अकुशल असून मजुरांची मजुरी रक्कम अदा करण्याची जबाबदारी पंचायत समितीची आहे. ग्रामपंचायतची नाही. सदर कामात झालेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रामपंचायत दोषी नाही. त्यामुळे अफरातफर प्रकरणात मी दोषी नाही.- अनुप उटाणे, माजी सरपंच कान्हळगाव.