शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
3
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
4
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
5
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
6
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
7
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
8
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
9
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
10
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
11
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
12
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
13
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
14
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
15
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
16
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
17
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
18
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
19
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
20
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहार वितरणात घोळ

By admin | Updated: July 3, 2014 23:22 IST

स्थानिक समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराची अफरातफर झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही चौकशी करण्यात आली नाही.

लाखनी : स्थानिक समर्थ विद्यालयात शालेय पोषण आहाराची अफरातफर झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे सदर प्रकरण दडपण्यात तर येत नाही ना? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेने केला आहे. पोषण आहार वाटपात घोटाळा झालेला आहे. यासाठी नेमके कोण जबाबदार आहे याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दि. १ एप्रिल रोजी पोषण आहाराचा शाळेला पुरवठा करण्यात आलेला आहे. माहिती अधिकारात तक्रारकर्त्यांनी माहिती मागीतल्यानंतर मुख्याध्यापकांनी खोटी माहिती दिली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन शाखा भंडारा यांच्याकडून साहित्य उचलल्याची खरी पावती मिळाली. मुख्याध्यापकांनी दिलेली पावती व जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेली पावती यात उचल केलेल्या साहित्यात तफावत दिसून येत आहे. हरभरा व तुरडाळीची शाळेने उचल केलेली नाही मोहरी, मिरची पावडर, हळद पावडर, आयोडीनयुक्त मिठाची उचल केलेली नाही. जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या पावतीमध्ये सर्व मालाची मोठ्या प्रमाणात उचल केलेली आहे.शाळेत गरीब मुलांना दुपारचे भोजन मिळावे यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन योजना व पोषण आहार योजना सुरु केली आहे. परंतु मुलांच्या आहाराची अफरातफर करीत आहे. रिपब्लिकन सेना आक्रमकसमर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.आर. कोल्हारे यांनी शालेय पोषण आहारात अफरातफर केल्याचा आरोप करुन दोषीविरुद्ध कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अचल मेश्राम, तुलशीदास गेडाम, भजनदास मेश्राम, राहुल मेश्राम यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)