भंडारा जिल्ह्यात मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू; १९१ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 22:21 IST2020-09-29T22:20:55+5:302020-09-29T22:21:13+5:30

भंडारा जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ११४ झाली आहे.

Nine died in Bhandara district on Tuesday; 191 corona positive | भंडारा जिल्ह्यात मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू; १९१ कोरोना पॉझिटिव्ह

भंडारा जिल्ह्यात मंगळवारी नऊ जणांचा मृत्यू; १९१ कोरोना पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण ११४ झाली आहे. आज ६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३४८० झाली असून आज १९१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५२९८ झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील ५९, साकोली २५, लाखांदूर १०, तुमसर ०८, मोहाडी ०८, पवनी ३९ व लाखनी तालुक्यातील ४२ व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत ३४८० रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या ५२८ झाली असून १७०४ क्रियाशील रुग्ण आहेत.
आज मंगळवारी आयसोलेशन वार्ड मध्ये १९२ व्यक्ती भरती असून २०४० व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: Nine died in Bhandara district on Tuesday; 191 corona positive