शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र वितरक बनला पोलीस उपनिरीक्षक

By admin | Updated: May 19, 2017 00:53 IST

घरात अठराविश्व दारिद्रय असूनही मनात ध्येयाच्या बळावर परिस्थितीवर मात करून वृत्तपत्र वितरकाचे

मुकेश देशमुख । लोकमत न्यूज नेटवर्क दिघोरी (मोठी) : घरात अठराविश्व दारिद्रय असूनही मनात ध्येयाच्या बळावर परिस्थितीवर मात करून वृत्तपत्र वितरकाचे काम करणाऱ्या तरूणाने पोलिस उपनिरिक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. दिघोरी (मोठी) येथील राजेश वसंता उंदीरवाडे असे या उमद्या तरूणाचे नाव आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडिलांना मदत व्हावी म्हणून २००८ ते २०१० मध्ये भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पथकात होमगार्डमध्ये उत्तमरित्या कार्य पार पाडले. यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात पोलीस शिपाई या पदावर निवड झाली. नक्षलग्रस्त भागात आपले कर्तव्य बजावत असतानाच मनात मोठे स्वप्न असल्याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे त्याने ठरविले. एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशिल गावात गट्टा (जोबिया) येथे कार्य बजावत असताना अनेक कठिण प्रसंगाला तोंड द्यावे लागले. या गावात कोणतेही वृत्तपत्र येत नव्हते, वाचनालयही नव्हते, शिकवणी वर्ग नाही, ध्येय गाठण्याच्या उद्देशाने राजेश उंदीरवाडे हा अभ्यासाला लागला व २०१६ साली झालेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकांच्या पदासाठी परीक्षा दिली. या परीक्षेत अनुसुचित जातीच्या १०९ जागांपैकी ५० व्या क्रमांकावर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. खडतर मार्गाने जीवन व्यतीत करीत असताना मोठे स्वप्न बाळगल्याचा फायदा राजेशला झाला. त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अजय गरीबीवर मात करून पोलीस उपनिरीक्षक झाला. दिघोरीत त्याचे कौतुक होत आहे. राजेशने यशाचे श्रेय आई-वडील, बहिण व मित्रांना दिले आहे.