अटींचे पालन करून नवदाम्पत्य विवाह बंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:01 IST2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:01:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात कोणताही बडेजाव न करता शासकीय नियम व अटींची पुर्तता येथील ...

 Newlyweds in compliance with the terms | अटींचे पालन करून नवदाम्पत्य विवाह बंधनात

अटींचे पालन करून नवदाम्पत्य विवाह बंधनात

ठळक मुद्देठवरे कुटुंबातील विवाह सोहळा : मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती



लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात कोणताही बडेजाव न करता शासकीय नियम व अटींची पुर्तता येथील एका विवाह समारंभात करण्यात आली. येथील रहिवासी व गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांच्या मुलाचा विवाह अगदी साध्या पद्धतीने मोजक्या आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत पार पडला. शारीरिक अंतर ठेवून नवदाम्पत्यांसह इतरांनी मास्क वापरून उपस्थिती दर्शविली.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांचे चिरंजीव सुजीत यांचा विवाह गावातीलच सुरेश रामटेके यांची मुलगी काजल यांच्याशी सामाजिक रितीरिवाजाप्राणे ४ महिन्यांपुर्वीच ठरला होता. दोन्ही पक्षाकडून २६ मे ही तारीख विवाहाची निश्चित करण्यात आली होती. मुला-मुलींच्या वडिलांनी लग्नपत्रिका सुद्धा छापून घेतल्या व लग्नाची तयारी झाली होती. मात्र अचानक कोरोनाचा शिरकाव झाला व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी ‘लॉकडाऊन’ तसेच संचारबंदी घोषीत करण्यात आली. यात विवाह सोहळयांवर निर्बंध लादण्यात आले. विवाह ठरलेल्या दिवशीच करायचा असा दोन्ही बाजूंनी ठरवले व कोणताही बडेजाव न करता अगदी साध्या पद्धतीने गावामधील मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२६) ‘शुभमंगल’ लावण्यात आले. विवाह समारंभाचे साक्षी होण्यासाठी गावचे सरपंच राधेशाम झोळे, माजी जि.प. सदस्य डॉ.शमकांत नेवारे, माजी पं.स. सदस्य प्रमोद पाऊलझगडे, तंमुसचे अध्यक्ष अधि. श्रीकांत बनपुरकर यांची उपस्थिती होती. बौद्ध विधीचे पठन करून एकनाथ बोधी यांनी नवदाम्पत्यांना विवाह बांधणात बांधले. उपस्थितांनी पुष्पवर्षाव करून आशीर्वाद दिला.

Web Title:  Newlyweds in compliance with the terms

टॅग्स :marriageलग्न