शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ

By admin | Updated: April 23, 2017 00:51 IST

बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे.

गराडा येथील भीम मेळावा: रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन भंडारा : बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संविधान हा ‘‘राष्ट्रीय ग्रंथ’’ असून त्याला शासनमान्यता मिळाली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार व कार्य सगळया समाजातील लोकांनी अंगिकारणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्गामुळे मानवाला शील, सदाचार, करुणा व मैत्रीची शिकवण देते, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड.़ रामचंद्र अवसरे यांनी केले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. चार दिवसीय कार्यक्रमादरम्यान गराडा (बु.) येथील पंचशिल बौध्द विहाराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. भंडारा तालुक्यातील गराडा (बु.) येथील पंचशील बुध्द विहार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते इंजि. रुपचंद रामटेके होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बि.सी. वानखेडे, अमरावती, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, प्रा. मनोज बागडे, मुलनिवासी महिला संघचे राष्ट्रीय प्रचारक शितल पिल्लेवान, पंचायत समिती सदस्य परसराम देशमुख, चन्नेश्वर रामटेके आदी विचारमंचावर उपस्थित होते. आमदार अ‍ॅड. अवसरे यांचे हस्ते इंजि. रुपचंद्र रामटेके व भारत गोंडाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंचा कुंदाताई मोहरकर, उपसरपंच पुरुषोत्तम गोंडाणे, भिमाई रामटेके, पोलीस पाटील दसाराम गाढवे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा सार्वे, निलीमा मेश्राम, नितेश गोंडाणे, पुरुषोत्तम गोंडाणे, हरिदास मेश्राम उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाकरिता मालता चव्हाण, सुनंदा मेश्राम, शर्मिला बन्सोड, चंद्रकला चव्हाण, निलम गोंडाणे, हेमलता मेश्राम, तृप्ती शेल्लारे, सुष्मा राऊ त, चित्रलेखा वासनिक यांनी विशेष प्रयत्न केले. संचालन भारत गोंडाणे व आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले. (नगर प्रतिनिधी)