भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ

By Admin | Updated: April 23, 2017 00:51 IST2017-04-23T00:51:08+5:302017-04-23T00:51:08+5:30

बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे.

National Constitution of India Constitution | भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ

भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ

गराडा येथील भीम मेळावा: रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन
भंडारा : बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संविधान हा ‘‘राष्ट्रीय ग्रंथ’’ असून त्याला शासनमान्यता मिळाली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार व कार्य सगळया समाजातील लोकांनी अंगिकारणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्गामुळे मानवाला शील, सदाचार, करुणा व मैत्रीची शिकवण देते, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड.़ रामचंद्र अवसरे यांनी केले.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. चार दिवसीय कार्यक्रमादरम्यान गराडा (बु.) येथील पंचशिल बौध्द विहाराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
भंडारा तालुक्यातील गराडा (बु.) येथील पंचशील बुध्द विहार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते इंजि. रुपचंद रामटेके होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बि.सी. वानखेडे, अमरावती, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, प्रा. मनोज बागडे, मुलनिवासी महिला संघचे राष्ट्रीय प्रचारक शितल पिल्लेवान, पंचायत समिती सदस्य परसराम देशमुख, चन्नेश्वर रामटेके आदी विचारमंचावर उपस्थित होते. आमदार अ‍ॅड. अवसरे यांचे हस्ते इंजि. रुपचंद्र रामटेके व भारत गोंडाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सरपंचा कुंदाताई मोहरकर, उपसरपंच पुरुषोत्तम गोंडाणे, भिमाई रामटेके, पोलीस पाटील दसाराम गाढवे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा सार्वे, निलीमा मेश्राम, नितेश गोंडाणे, पुरुषोत्तम गोंडाणे, हरिदास मेश्राम उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाकरिता मालता चव्हाण, सुनंदा मेश्राम, शर्मिला बन्सोड, चंद्रकला चव्हाण, निलम गोंडाणे, हेमलता मेश्राम, तृप्ती शेल्लारे, सुष्मा राऊ त, चित्रलेखा वासनिक यांनी विशेष प्रयत्न केले.
संचालन भारत गोंडाणे व आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: National Constitution of India Constitution