शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला

By admin | Updated: October 18, 2016 01:48 IST

मागील अनेक दिवसांपासून ज्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांच्या नजरा एकवटलेल्या होत्या, त्या

१८ डिसेंबरला निवडणूक : राजकीय मोर्चेबांधणीला वेग, उमेदवारीसाठी ईच्छुकांची चढाओढ, काहींना उमेदवारांचा शोध भंडारा : मागील अनेक दिवसांपासून ज्या निवडणुकांकडे राजकीय पक्षांच्या नजरा एकवटलेल्या होत्या, त्या नगरपालिका निवडणुकांचा बिगुल अखेर आज सोमवारला वाजला. १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व नव्याने होऊ घातलेल्या साकोली नगर परिषदेसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जारी होईल, त्या तारखेपासून जिल्ह्यातील चारही नगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम घोषित करतील. १९ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते ३ पर्यंत नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत नामनिर्देशनपत्राची छानणी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेला करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा त्यापूर्वी करण्यात येईल. १३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया होईल. १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होईल, त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल, असा राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जारी केला आहे. सामाजिक समिकरणातून उमेदवारांचा शोध थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षात सामाजिक समिकरणात सरस ठरणारा उमेदवार देण्याकडे पक्षश्रेष्ठीचा कल आहे. भंडारा ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तुमसर खुला प्रवर्गासाठी, पवनी ओबीसी महिला प्रवर्गासाठी तर साकोली अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. भंडारा आणि तुमसरात ओबीसी आणि खुला प्रवर्ग असल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षाकडे उमेदवारांची रांग लागलेली आहे त्यामुळे विरोध नसलेला आणि सर्वांना चालणारा उमेदवार शोधण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे. (जिल्हा प्रतिनिधी) विधान परिषद निवडणूक लांबणीवर ४राज्यात ११ जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सहा जागांसाठी तर पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी होणार आहे. पहिले विधान परिषद निवडणुका त्यानंतर नगर परिषद निवडणुका होतील, असा राजकीय पक्षांचा अंदाज होता. परंतु निवडणूक आयोगाने पालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केल्यामुळे विधान परिषद निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. -तर लख्ख प्रकाशाविना दिवाळी ४विधान परिषद निवडणुकीत मतांसाठी घोडेबाजार रंगतो. आतापासूनच मतांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. अशातच नगरपालिका निवडणुकांनंतर विधान परिषद निवडणूक झाली तर विद्यमान नगरसेवकांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. नगर पालिकेत पुन्हा निवडून आल्यानंतरच विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी संधी मिळणार आहे. परंतु ज्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल, त्यांची दिवाळी लख्खप्रकाशाविना जाण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरपासून आचार संहिता ४राज्यात १९२ नगरपरिषद व २० नगर पंचायतींसाठी २७ नोव्हेंबर, १४, १८ डिसेंबर व ८ जानेवारी अशा चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुका तिसऱ्या टप्प्यात होणार असल्यामुळे १५ नोव्हेंबरपासून भंडाऱ्यात आचारसंहिता सुरू होईल. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्याबरोबरच आचारसंहिता सुरू होते, असा समज असतो. परंतु त्या-त्या जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच आचारसंहिता लागू होत असते. -तर दिवाळीपूर्वीच फटाके ४यावर्षी ३० आॅक्टोबरला दिवाळी हा सण असला आणि १८ डिसेंबरला निवडणूक होणार असली तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे उमेदवारीसाठी फटाके बांधणे सुरू होणार आहे. सर्वच राजकीय पक्षात नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. एका जागेसाठी अनेकांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे सामाजिक समिकरणाचा अभ्यास करून उमेदवारी देण्याकडे पक्षश्रेष्ठीचा कल राहील.