साकोली, लाखांदूरमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:10+5:30

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभर जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र २७ एप्रिल रोजी गराडा येथील एका ४५ वर्षीय महिलेचा नमूना पॉझिटिव्ह आला आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या ४० वर पोहचली आहे. आतापर्यंत १२ रुग्ण कोरोनामुक्त झाली असून ३१ क्रियाशिल रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Most coronated in Sakoli, Lakhandur | साकोली, लाखांदूरमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित

साकोली, लाखांदूरमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह रुग्ण ३१ : आतापर्यंत १२ कोरोनाबाधितांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात आता जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना बाधीतांची संख्या ४० वर पोहचली असून सर्वाधिक रुग्ण साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील आहेत. पुणे आणि मुंबई येथून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १२ कोरोनाबाधीतांना सुटी देण्यात आली असून सध्या जिल्ह्यात ३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभर जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र २७ एप्रिल रोजी गराडा येथील एका ४५ वर्षीय महिलेचा नमूना पॉझिटिव्ह आला आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या ४० वर पोहचली आहे. आतापर्यंत १२ रुग्ण कोरोनामुक्त झाली असून ३१ क्रियाशिल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण साकोली आणि लाखांदूर तालुक्यात असल्याचे दिसत आहे. साकोली तालुक्यात १८ आणि लाखांदूर तालुक्यात ११ कोरोनाबाधीत असल्याची नोंद घेण्यात आली. या तालुक्यांसह जिल्ह्यात मुंबईसह महानगरातून आलेल्या बहुतांश व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले आहे. भंडारा तालुक्यात पाच, तुमसर, मोहाडी आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी एक तर पवनी तालुक्यात तीन कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधीतांची नोंद
लाखांदूर तालुक्यातील दोन व्यक्तींचे नमुने बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे दोन व्यक्ती १५ व १६ मे रोजी मुंबई येथून लाखांदूर तालुक्यात आले होते. दोन्ही व्यक्ती पुरुष असून त्यांचे वय २६ व २८ आहे. या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. मंगळवारी रात्री दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

१९९७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
ांडारा जिल्ह्यातून आतापर्यंत २०७५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर १९९७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ३८ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
बुधवारपर्यंत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डामध्ये ३२ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३३० व्यक्तींना सुटी देण्यात आली. तर कोवीड केअर सेंटर साकोली, तुमसर, मोहाडी येथे २४० व्यक्ती भरती आहेत. १५३० व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे. प्रशासन बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवून असून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील १४० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या नेहमी संपर्कात असलेल्या कर्मचाºयांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. इतर कार्यालयातही आरोग्य तपासणीची आवश्यकता आहे.

९५ हजार नागरिकांकडे आरोग्य सेतू अ‍ॅप
जिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार २२ नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. भारत सरकारने कोवीड - १९ ची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप विकसीत केला आहे. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ९५ हजार २२ नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले.

Web Title: Most coronated in Sakoli, Lakhandur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.