शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

तीन लक्ष मतदार ठरविणार तुमसर क्षेत्राचा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:00 AM

पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर -मोहाडी तालुक्याची ओळख आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्ली गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभलेला परंतु विकासाकरिता तरसणारा असा हा मतदार संघ आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातील चर्चेतील मतदार संघ : जातीय समीकरणानुसार उमेदवारीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर - मोहाडी विधानसभा मतदार संघात एकुण मतदारांची संख्या ३०१७३० असून पुरुष मतदार संख्या १५२७७९ व महिला मतदार १४८९५१ आहे. ३५६ मतदान केंद्रे आहेत. राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या तुमसर मतदार संघाला किंग ३०१७३० मतदार ठरविणार आहेत. या मतदार संघात तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश आहे. सन २००९ मध्ये नव्याने मोहाडी तालुक्याचा समावेश तुमसर मतदार संघात करण्यात आला.पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून तुमसर -मोहाडी तालुक्याची ओळख आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात सर्वात मोठी तांदळाची बाजारपेठ तुमसर शहरात आहे. या शहरातून दोन खासदार दिल्ली गेले. राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू म्हणून तुमसर शहराची ओळख आहे. संपन्नता लाभलेला परंतु विकासाकरिता तरसणारा असा हा मतदार संघ आहे. भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक संपन्नता तुमसर मतदारसंघाला लाभली आहे.वैनगंगा, बावनथडी नद्या, बावनथडी, सोंड्या सिंचन योजना मोठे तलाव येथे आहेत. परंतु येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीत विशेष फरक पडला नाही. मॅग्नीजच्या जगप्रसिद्ध खाणी या तालुक्यात आहेत. परंतु सर्वसामान्यांना त्यांचा काहीच फायदा नाही. रेल्वे या मतदारसंघातून जाते. आंतरराज्यीय सीमा येथे भिडल्या आहेत. तुमसर- रामटेक नव्याने  राष्ट्रीय महामार्गाची घोषणा करण्यात आली.सराफा बाजार हे दुसरे मोठे वैशिष्ट्ये तुमसरचे आहे. या मतदारसंघ जातीचे प्राबल्य दिसूनयेते. मागील २५ वर्षात येथे चार वेळा भाजपने बाजी मारली. तर सन २००९ मध्ये काँग्रेसचे अनिल बावनकर निवडून आले होते. १९९४ ते २००४ पर्यंत भाजपचे मधुकर कुकडे येथे विजयी झाले होते. २०१४ मध्ये भाजपचे चरण वाघमारे यांनी काँग्रेस - राकांकडून हा मतदार संघ हिसकावून घेतला. पुन्हा येथे भाजप- सेना व काँग्रेस- राका आघाडी अशी थेट लढत आहे.मतदारांच्या संख्येत वाढतुमसर - मोहाडी मतदार संघात २३०० मतदारांची वाढ झाली आहे. सेनादलातील मतदारांची संख्या ७२६, दिव्यांग मतदार १२७४, बीएलओ संख्या ३५६, सावी मतदार केंद्र ०२, आदर्श मतदान केंद्र ०२, क्रिटीकल मतदान केंद्र ०३, क्षेत्रीक अधिकारी ३३ अशी नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019