शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकाच्या काळातील अंदाजपत्रक दिशाभूल करणारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2017 00:49 IST

नगरपंचायतीच्या प्रशासकांनी त्यांच्या कार्यकाळात तयार केलेले अंदाजपत्रक हे जनतेची दिशाभूल करणारे असून

अंदाजपत्रक नव्याने तयार करा : रवी परशुरामकर यांची मागणी साकोली : नगरपंचायतीच्या प्रशासकांनी त्यांच्या कार्यकाळात तयार केलेले अंदाजपत्रक हे जनतेची दिशाभूल करणारे असून साकोली व सेंदूरवाफा या गावासाठी नाही. त्यामुळे हे सर्व अंदाजपत्रक नमूद करून नागरिकांच्या मागणीनुसार नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात यावे व या अंदाजपत्रकावर प्रशासकाच्या काळातील झालेला खर्च वसुल करण्यात यावा अशी मागणी नगरसेवक रवी परशुरामकर यांनी केली आहे. साकोली नगरपरिषदेवर प्रशासकाची नेमणूक झाल्यावर साकोली नगर परिषदेअंतर्गत शौचालय बांधकाम, पिण्याच्या पाण्याची सोय, नाली सफाई यासारखे विविध महत्वाची कामे असताना प्रशासकांनी या कामाकडे स्पष्ट दुर्लक्ष करून मनमर्जीने फक्त काहीच प्रभागातील कामांना प्राधान्य देऊन कामांचे अंदाजपत्रक तयार करून लाखो रुपये खर्च केले. व इतर विकास कामांकडे दुर्लक्ष केले. ग्रामीण पाणी पुरवठा योजना अंतर्गत पिण्याचे पाणी देण्यात येत होते. मात्र मागील सात आठ वर्षापूर्वी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन पूर्णत: निकामी झाली. त्यामुळे साकोली येथील गणेश वॉर्ड व तलाव वॉर्ड या दोनच वॉर्डात पाण्याची सोय आहे. उर्वरीत साकोली व सेंदूरवाफा या दोन्ही गावात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दोन्ही गावाच्या नाल्यात कचरा पडला होता. नाल्याची साफसफाई करण्यात आली नाही. संडास तयार करण्यात आले नाही. अशी अनेक महत्वपूर्ण कामे प्रशासकांनी केली नाही व फक्त अंदाजपत्रक तयार करून लाखो रुपयाची उधळण केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक परशुरामकर यांनी केली आहे. प्रशासकांनी मनमर्जीने तयार केलेल्या कामाचे अंदाजपत्रक हे जनतेची दिशाभूल करणारे असून ही कामे प्रत्येक प्रभागातील नाही. जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय काळातील कामांना प्रशासकीय मागणी न देता ती मान्यता तात्काळ थांबवावी व यास नवीन कामाचा समावेश करावा व जनतेला सहकार्य करावे. (तालुका प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार प्रशासकाच्या काळातील व कामाचे तयार करण्यात आलेल्या अंदाजपत्रक प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असून दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईची मागणी करणार असल्याचेही नगरसेवक परशुरामकर यांनी सांगितले.