शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

घर लाखोंचे पण सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

शहरात घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रात्रच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या झाल्या व होत आहेत, त्याही कडीकोंडा तोडून शहराबाहेरील वसाहतींत घरफोड्या अधिक प्रमाणात होत आहे. आता शहरातही दाट वस्तीत घरफोड्या झाल्या आहेत. कुठल्याही धातूचे कुलूप फोडून घरफोडी व्हायची. कुलूप असो वा कडीकोंडा नाजूक बनले आहेत. डायकास्ट, ब्रासचे हे आकर्षक दिसणारे कडीकोंडे दाराची शोभा वाढवितात, पण सुरक्षितता धोक्यात आणतात.

ठळक मुद्देदिवाळीत चोरीच्या घटना : संशयास्पद हालचाली वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुलूप तोडण्याऐवजी हातोडीने कडीकोंडाच एका दणक्यात तोडून घरफोडी करण्याच्या घटना शहरात घडत आहेत. लाखो रूपयांचे घर आपण बांधतो, पण कुलूप, कडीकोंडा शोभेचा बसवितो. शहरात घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. रात्रच नव्हे, तर दिवसाही घरफोड्या झाल्या व होत आहेत, त्याही कडीकोंडा तोडून शहराबाहेरील वसाहतींत घरफोड्या अधिक प्रमाणात होत आहे. आता शहरातही दाट वस्तीत घरफोड्या झाल्या आहेत. कुठल्याही धातूचे कुलूप फोडून घरफोडी व्हायची. कुलूप असो वा कडीकोंडा नाजूक बनले आहेत. डायकास्ट, ब्रासचे हे आकर्षक दिसणारे कडीकोंडे दाराची शोभा वाढवितात, पण सुरक्षितता धोक्यात आणतात.कडीकोंडा, लॉक दाराच्या आतील बाजूस बसविणे व दाराच्या जाडीत सेफ्टी सेक्युरिटी लॉक बसविले जात आहे. यात डेड लॉक प्रकारात हाताने लॉक उघडता येते. ऑटो लॉक प्रकारात ऑटोमॅटिक लॉक लागते. टू इन बोल्ट प्रकारात एक अतिरिक्त लॉक असते. ट्राय बोल्टमध्ये तीन लॉक सिस्टीम असते. याशिवाय थ्री फोर, सिक्स स्ट्रोक या प्रकारातही सेफ्टी लॉक उपलब्ध घाले आहेत. थोड्या महाग असलेल्या सेफ्टी लॉक सिस्टीमध्ये कॉम्प्युटर किल्ली अल्ट्रा की असते. यामुळे बनावट किल्ली कंपनीशिवाय कोणालाच बनविता येत नाही.४५० रूपयांपासून ते १० हजार रूपयांपर्यंत हे सेफ्टी सेक्युरिटी लॉक विक्री होत आहेत. याशिवाय लक्झरी फ्लॅट व रो-हाऊस, बंगल्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्हिडीओ सिस्टीम बसविली जात आहे. बहुतांश अपार्टमेंट, बंगल्यांमध्ये बिर्ल्डसच आता इलेक्ट्रॉनिक्स व्हिडीओ सिस्टीम बसवीत आहेत. यासंदर्भात एका कडीकोंडा, कुलूप विक्रेत्याने सांगितले की, कडीकोंडा, कुलूपाविषयी ग्राहकांमध्ये आणखी जागृतीची गरज आहे. कारण लाखो, कोटी रूपये फ्लॅट, घर वा बंगल्यावर खर्च केले जातात. पण दारावर कडीकोंडा मजबुतीऐवजी आकर्षक दिसणारा बसवला जातो.ज्यांच्या घरी चोरी किंवा घरफोडी होते, त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरटा नेतो. हे दागिने कमवण्यासाठी त्याला अनेक वर्षे कष्ट घ्यावे लागलेले असतात. कित्येकदा पगार, शैक्षणिक, घर कार्यक्रमासाठी आणून ठेवलेली रोकड पळविली जाते. यातून सावरण्यासाठी त्याला खूप दिवस लागतात.चोरटा सापडेल याची नेमकी शाश्वती मिळत नाही, त्यामुळे पुन्हा शून्यातून सर्व संसार उभा करावा लागतो. याकडे पोलीस विभागासह नसगरिकांनी लक्ष देण्याची गरज आहे.शोभेच्या कडीकोंड्यामुळे चोरट्यांचे फावलेघराला दणकट कुलूप लावाजास्त काळ बाहेर जायचे असल्यास शेजाऱ्यांना व जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी, बाहेरगावी कोठे जाणारतेथील संपर्काचा क्रमांक द्यावादागिने व इतर मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यातरात्री घरातील एखादा तरी दिवा सुरू राहील, अशी व्यवस्था असावीघरात येणाºया सेल्समनची चौकशी करून खात्री करापरगावी जाताना अपार्टमेंटमधील रखवालदारास सूचना द्याअत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवावीघराच्या आजूबाजूच्या परिसरात रात्रीही प्रकाश व्यवस्था ठेवावी.अशाप्रकारे केली जाते चोरीसंशयास्पद हालचाली वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावाकुलूप कापून चोरी करणे, तिजोरी कटावणीने उचकटणे,कडकोंड्यामधील कुलूप असलेला कोंडा तोडणेलॅच असलेल्या जागा उचकटून काढणेदरवाजाचा कडीकोंडा तोडणे, भरदिवसा घरात घुसणे,लोखंडी दरवाजाचा कडीकोंडा मोडून काढणेभिंतीला भगदाड पाडून घरात, बंगल्यात प्रवेश करणेबंद घरे हेरून चोरी करणे आदी प्रकार घडतात.पत्ना उचकटून घरात प्रवेश करणे

टॅग्स :Thiefचोर