शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत मजुरांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

महिला मजुरांकडून वजनमाप करणारे वाहने रोखून धरण्यात आले. काही काळ व्यवहार बंद करण्यात आला. त्यावेळी बाजार समितीचे सचिव व सहसचिव व संचालक सेलोकर यांनी वजन काट्याकडे धाव घेत सदर मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिला मजूर व मापारी हे काहिही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

ठळक मुद्देतुमसर येथे महिला मजूर आक्रमक : काम द्या, नाहीतर खरेदी - विक्री बंद करा

राहुल भुतांगे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर कृषी बाजार समीतीत सोशल डिस्टन्सिंग ठेवून शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यात आला. परंतू बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाच्या लिलावावरुन शेतकरी, हमाल, मापारी, अडते, व्यापारी यांच्यात सामाजिक अंतर ठेवण्यात आले नाही. त्यामुळे चक्क बाजार समितीच्या यार्डात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.
देशासह राज्यात कोवीड १९-कोरोना व्हायरस विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आला असून, काही जीवनावश्यक वस्तूबरोबर कृषीविषयक उद्योगधंद्यांना लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली. त्याच धर्तीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केड यार्डावर शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीस आणता यावा व त्यांना लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक व्यवहार करण्यासंबधी राज्यातील शेतकºयांना शेतमाल खरेदी विक्रीची मुभा देण्यात आली. त्यामुळे येथील बाजार समीती प्रशासनाच्या वतीने काही नियम अटी घालून शेतकºयांनी विक्रीस आणलेल्या मालाची थेट बाजार समीतीच्या धर्मकाट्यावर वजन करून माल खरेदी विक्रीचा व्यवहार सुरू करण्यात आला. परंतू २० एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जेव्हा बाजार समितीत शेतकºयांच्या शेतमालाचा वजनमाप धर्मकाट्यावर करायला सुरुवात करण्यात आली. तेव्हा येथील संतप्त महिला व पुरुष मापारी, मजुरांनी चक्क काही काळ बाजार समितीच्या वजन काट्याजवळ आपला ठिय्या मांडला. जो पर्यंत बाजार समितीत आमच्या हाताला काम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शेतकºयांच्या शेतमालाचा वजनमाप धर्मकाट्यावर करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत ठिय्या मांडला.
दरम्यान महिला मजुरांकडून वजनमाप करणारे वाहने रोखून धरण्यात आले. काही काळ व्यवहार बंद करण्यात आला. त्यावेळी बाजार समितीचे सचिव व सहसचिव व संचालक सेलोकर यांनी वजन काट्याकडे धाव घेत सदर मजुरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त महिला मजूर व मापारी हे काहिही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
ज्या प्रमाणे बाजार समीतीच्या खुल्या मार्केट यार्डात सामाजिक अंतर राखून शेतकऱ्याच्या शेतमालाचा, खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात होता. मालाचा वजनमाप हात काट्याने करून, येथील व्यापारी, अडते, मापारी, महिला पुरूष हमालांच्या हाताला काम मिळत होता. परंतु आजघडीला सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत बाजार समितीने शेतकºयांचा शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवहार करतांना गर्दी टाळण्यासाठी शेतमालाचा वजनमाप हा धर्मकाट्यावर करण्याचा निर्णय घेतला. त्यात व्यापारी, अडते, शेतकरी, यांचा व्यवहार सुरू झाला. परंतु येथील हातावर पोट भरणाऱ्या, हमाल, मापारी, मजूरवर्ग शेतकºयांनी विक्रीस आणलेल्या मालाची व्यापारी यांच्या बारदाण्यात भराई करणे, मालाचा हात काट्याने वजनमाप करणे, साफ सफाई करणे असा त्यांच्या हाताला काम मिळत असतो. त्या मोबदल्यात त्यांना शेतकºयांकडून व संबधित व्यापाºयाकडून प्रत्येकी पोत्यामागे मजुरी म्हणून आर्थिक मोबदला दिला जात असतो. परंतु सोमवारी बाजार समिती मधील धर्मकाट्यावरील वजनमापाचा व्यवहार सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत करण्याचा खरा प्रयत्न केला असला तरी, सोमवारी येथील शेकडो महिला-पुरुष, मजूर आपल्या नियमित मजुरीपासून वंचित राहिल्याने ते संतप्त झाले. त्यामुळे त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत काही काळ बाजार समितीच्या धर्मकाट्यावर आपला ठिय्या मांडून गर्दी जमवीत वाहनावरून मालाचा धर्मकाट्यावर केला जाणारा वजनमाप रोखून धरले. दरम्यान बाजार समिती प्रशासनाच्या वतीने वेळीच पोलिसांना बोलावून गर्दी बाजूला करण्यात आल्यानंतर वातावरण निवळले.

हमाल मजुरीपासून वंचित
बाजार समितीच्या मार्केड यार्डात नियमित काम करणाºया हमाल व मापारी यांना सोशल डिस्टन्सिंगचा नियम राखत बाजार समितीत काम देण्याची मागणी सुध्दा हमालांनी केली आहे. जर धर्मकाट्यावर शेतमालाचा वजनमाप केला जाईल तर हमाल, मापारी, मजूर वर्ग मजूरी पासून वंचित राहतील त्यामुळे पूर्ववत सोशल डिस्टन्सिंगचा राखत शेतमालाचा खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात यावा त्यामुळे हमालांच्या हाताला काम मिळेल व ते मजुरीपासून राहणार नाही व इलेक्ट्रॉनिक धर्मकाट्यावर वजनमाप केला तर हमाल, मापारी महिला, पुरूष मजुरीपासून वंचित राहतील.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या मार्केड यार्डात शेकडो हमाल, मापारी, महिला-पुरूष मजूरवर्ग आपल्या नियमीत मजुरीपासून वंचित राहिल्याने त्यांनी चक्क धर्मकाट्यावर ठिय्या मांडला असल्याने येथे गर्दी झाली होती. दरम्यान येथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.

टॅग्स :Socialसामाजिक