बाजारातून बैल जातात थेट कत्तलखान्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 06:00 AM2019-11-21T06:00:00+5:302019-11-21T06:00:44+5:30

सिहोरा येथील आठवडी बैल बाजारात नजिकच्या मध्यप्रदेशातून जनावरे मोठ्या प्रमाणात विक्री करिता आणली जात आहेत. मध्यप्रदेशात जनावरांच्या मांस विक्रीवर बंदी असली तरी कत्तलखान्यात विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आली आहे. परंतू सिमावर्ती गावात यात लवचिकता असल्याने आठवडी बाजारात गाय विक्रीचे प्रमाण अधिक आहे.

From the market bulls go directly to the slaughterhouse | बाजारातून बैल जातात थेट कत्तलखान्यात

बाजारातून बैल जातात थेट कत्तलखान्यात

Next
ठळक मुद्देसिहोरा येथील प्रकार : पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : विदर्भात जनावरांच्या खरेदी विक्रीकरिता प्रसिद्ध असणाऱ्या तालुक्यातील सिहोरा येथील शनिवार रोजी आयोजित होणाऱ्या आठवडी बाजारातून थेट कत्तलखान्यात जनावरांची रवानगी होत असल्याचे चित्र आहे. मात्र या प्रकरणात स्थानिक पोलीस प्रशासनाने केवळ बघ्यांची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
सिहोरा येथील आठवडी बैल बाजारात नजिकच्या मध्यप्रदेशातून जनावरे मोठ्या प्रमाणात विक्री करिता आणली जात आहेत. मध्यप्रदेशात जनावरांच्या मांस विक्रीवर बंदी असली तरी कत्तलखान्यात विक्रीवर कडक निर्बंध घालण्यात आली आहे. परंतू सिमावर्ती गावात यात लवचिकता असल्याने आठवडी बाजारात गाय विक्रीचे प्रमाण अधिक आहे. परिणामी नागपूर, कामठी येथील व्यापारी सिहोरा येथील बाजारात धाव घेत आहेत. स्वस्त दरात जनावरांची खरेदी केल्यानंतर सदर बाजारातून थेट कत्तलखान्यात जाणाºया जनावरांच्या शरीरावर लाल, हिरवा निशात लावले जात आहे.
म्हैस या जनावरांना बाजारात आणत असताना या जनावरांना वाहनात कोंबले जाते तर या उलट गाय आणि बैल या जनावरांना वाहनात कोंबले जात नाही. या जनावरांना हरदोली गावाच्या शिवारापर्यंत बैल बाजारातून पायदळे नेले जाते व ते जनावरे पोहचताच तिथे उभ्या असलेल्या ट्रकमध्ये जनावरे कत्तल खान्याकरिता कोंबले जावून जनावरांची रवानगी केली जात आहे. कत्तलखान्यात रवानगी होणाऱ्या जनावरांची सर्वाधिक खरेदी याच बाजारातून केली जात आहे. स्थानिक सिहोरा पोलीस प्रशासनाला या संदर्भात माहिती आहे.
याशिवाय परिसरात बजरंग दल शाखा कार्यरत असताना कत्तल खान्यातील जनावरे खरेदी विक्रीच्या व्यवसायावर आडा घालण्याचे प्रयत्न होत नाही. यामुळे जनावरे खरेदी विक्रीच्या व्यवसायात गडबड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवडी बाजारदिनी जिल्ह्यातील ठिकाणावरचेही पोलीस येथे हजेरी लावताना दिसून येतात. सारे काही आलबेल असल्याचे चित्र आहे. दरम्यान या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या. परंतू चौकशी तथा कारवाई अजुनपर्यंत तरी करण्यात आली नाही. यामुळे प्रशासकीय यंत्रणाही या कार्यात सहकार्य करित असल्याचे जाणवते. याशिवाय परिसरात जनावरे खरेदी विक्री बाह्य व्यापार सुरू आहे. कत्तल खान्यात जनावरे विक्री या व्यापाऱ्यातून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या हिताकरिता बैल बाजार असेल तरी व्यापाºयांचे जाडेच या बाजारात दिसून येत आहे.

Web Title: From the market bulls go directly to the slaughterhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.