शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी शाळा बंद करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:01 IST

राज्याचे सरकार दिशाहीन झाले आहे. मुख्याध्यापकांनी शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. मुख्याध्यापकांचे बारीकसारीक प्रश्न मार्गी लागावे यासाठी काम केले पाहिजे. संघटनेने शक्ती उभी राहते. संघटन मजबूत करा. लोकाभिमुखी व्हा. मराठी शाळा बंद करण्याचा डाव उलथून पाडा, असे आवाहन राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडीकर यांनी केले.

ठळक मुद्देमारोती खेडीकर : मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : राज्याचे सरकार दिशाहीन झाले आहे. मुख्याध्यापकांनी शाळेच्या सर्वांगिण विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. मुख्याध्यापकांचे बारीकसारीक प्रश्न मार्गी लागावे यासाठी काम केले पाहिजे. संघटनेने शक्ती उभी राहते. संघटन मजबूत करा. लोकाभिमुखी व्हा. मराठी शाळा बंद करण्याचा डाव उलथून पाडा, असे आवाहन राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडीकर यांनी केले.भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची सभा येरली येथे फार्म हाऊसवर घेण्यात आली. त्यावेळी ते मुख्याध्यापकांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित होते. व्यासपीठावर विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप, संघटन सचिव अनील बाळसराफ, कार्याध्यक्ष अशोक पारधी, राजकुमार बालपांडे, गणपतराव टिचकुले, ए.पी. डोमळे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी विदर्भाचे सचिव सतीश जगताप म्हणाले, मुख्याध्यापकांना सातव्या वेतन आयोगात ५४०० ग्रेड पे देण्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक संघाने चर्चा करून बक्षी समितीला दिला. निवड श्रेणी बाबतही शासन सकारात्मक आहे. पुढील काळात माध्यम निहाय संच मान्यता केली जाणार आहे. २०१२-१३ च्या पायाभूत पदांना पटसंख्येच्या अटीवर संरक्षण दिले गेले आहे. मुख्याध्यापकांनी शासनाशी संघर्ष करण्यासाठी संघटना मजबूत करावी असे सांगितले. संघटनेची पायाभरणी तालुका पातळीवरून व्हावी, मुख्याध्यापकांना संघास जोडले गेले जावे असे विदर्भ कार्याध्यक्ष अशोक पारधी यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी राजकुमार बांते, अविनाश डोमळे, अनील बाळसराफ, राजकुमार बालपांडे, मनोहर मेश्राम, मधुकर झलके, हरिदास भुरे यांचीही भाषणे झाली. सभेत नांदेड येथील राज्य अधिवेशनात उपस्थित राहण्याबाबत वरिष्ठ वेतन श्रेणी, संघटना बांधणी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती, वर्धीत मान्यता, मार्गदर्शन शिबिर, तालुका व जिल्हा अधिवेशन या बाबत चर्चा करण्यात आली. संचालन जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.एन. टिचकुले यांनी केले. आभार व्यक्त अनमोल देशपांडे यांनी केले. सभेला मुख्याध्यापक संघटनेचे नेते रामेश्वर लांडे, गोपाल बुरडे, खेमराज डोये, पद्माकर सिंगनजुडे, सुनील घोल्लर , दिलीप वासनिक, अरविंद काशिवार, शालीकराव चेटुले, उमेश पडोळे, विजय देवगिरीकर, पी.डी. मुंगमोडे, के.ए. पुप्पलवार, डी.एफ. काळे, एच.ए. सिंगनजुडे, प्रमोद मुडकुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.