शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

मंडई उत्सव म्हणजे ग्रामीण कलावंताचे व्यासपीठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 21:46 IST

या विज्ञान युगात मंडई, मेला, दंडार, नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही लोककला जोपासली जात आहे. ग्रामीण कलावंतांना या मंडई उत्साहात झाडीपट्टी रंगभूमिका लेखक, कलावंत दिले आहेत. यातूनच झाडीपट्टी रंगभूमिची निर्मिती होवून अनेक रंगभूमी उदयास आल्या आहेत. गावात सादर होणाऱ्या नाट्य मंडळांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन द्या, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक यांनी केले.

ठळक मुद्देयुवराज वासनिक : चिचाळ येथे गुणवंतांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : या विज्ञान युगात मंडई, मेला, दंडार, नाटकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात ही लोककला जोपासली जात आहे. ग्रामीण कलावंतांना या मंडई उत्साहात झाडीपट्टी रंगभूमिका लेखक, कलावंत दिले आहेत. यातूनच झाडीपट्टी रंगभूमिची निर्मिती होवून अनेक रंगभूमी उदयास आल्या आहेत. गावात सादर होणाऱ्या नाट्य मंडळांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन द्या, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य युवराज वासनिक यांनी केले.लायन्स क्लब बाजार चौक चिचाळच्या वतीने झाडीपट्टी रंगभूमी वडसा व चौरास पट्टी रंगभूमी मिश्रीत जय बजरंग नाट्य मंडळ निर्मित खैरी दिवाणच्या मौजा चिचाळ येथे 'बारबाद' या नाट्य प्रयोग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सभापती पंचायत समिती पवनी बंडू ढेंगरे, अध्यक्ष माजी सभापती युवराज वासनिक, प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई, पंचायत समिती सदस्या मंगला रामटेके, निलेश सावरबांधे, यशवंत लोहकर, उपसरपंचा मंजुषा गभणे, ग्रामपंचायत सदस्या मोना तिभागेवार, महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, सरपंचा पाथरी जयश्री रोडगे, सरपंच आकोट मनिषा गजभिये, अशोक सम्राट सेना संस्थापक माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश काटेखाये, मुनिर शेख, तुलशीराम गेडाम, जयराम दिघोरे, विक्की पचारे, आशिष मेश्राम, दिनेश नंदपुरे, अनिल तेलमासे, जयश्री कुंभलकर, अल्का काटेखाये, नलू बिलवणे, वर्षा काटेखाये, जगतराम गभणे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात पाहुण्याचे हस्ते सत्र २०१८ तील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता १२ व १० वीतील संकेत निवृत्ती तलमले, अनुश्री रविंद्र तलमले, प्रणय राजु काटेखाये यांना स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. लायन्स क्लब चिचाळच्या वतीने गावात शैक्षणिक सांस्कृतिक, शारीरिक, अनेक क्षेत्रातील उपक्रम राबविले जातात, अशा कल्बला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे उपसरपंचा मंजुषा गभणे म्हणाल्या तर तोमेश्वर पंचभाई, निलेश काटेखाये, मंगला रामटेके आदींची भाषणे झाली.संचालन राजेश नंदपुरे, आभार अनुप हातेल कार्यक्रम यशस्वितेसाठी रवि आसंगारी, संदीप मोरे, निखिल वाहने, अखिल शहारे, मंगेश गजभिये, निकेश हातेल, सुधाकर हातेल, सोनु हातेल, रमेश लेंडे, टेकराम मांडवकर, किशोर वैरागडे, सोनु उके, धनराज काटेखाये, दिनेश हातेल, आशिष पडोळे आदींनी सहकार्य केले.