आरोग्य केंद्राचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:01:19+5:30

तालुक्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील सर्व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी नियमित वैद्यकिय अधिकारी गट. अ असून या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे परिसरातील नागरीकांना पाहीजे त्याप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही.

The management of the health center is on the shoulders of the person in charge | आरोग्य केंद्राचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर

आरोग्य केंद्राचा कारभार प्रभारीच्या खांद्यावर

Next
ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : आरोग्य सेवा कोलमडली, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्हा परिषद भंडारा आरोग्य विभागा अंतर्गत जिल्ह्यातील सर्व सात ही तालुक्यात एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. एकूण ६६ वैद्यकीय अधिकारी गट अ ची पदे मंजूर आहेत. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी एमबीबीएसची एकूण ४३ पदे भरलेली असले तरी नियोजनाअभावी तालुक्यात प्रथम सुरू झालेले गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याची जागा वर्षभरापासून रिक्त आहे. आरोग्य केंद्राचा कारभार हे प्रभारीच्या खांद्यावर असल्याने आरोग्य सेवा पूर्णत: कोलमडली आहे.
तालुक्यातील गोबरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यातील सर्व प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी नियमित वैद्यकिय अधिकारी गट. अ असून या ठिकाणी प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आलेला आहे.
त्यामुळे सदर वैद्यकीय अधिकारी हे प्रभारी असल्यामुळे परिसरातील नागरीकांना पाहीजे त्याप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. गोबरवाही हे गाव तालुक्यातील दुर्गम क्षेत्रात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही येथे नियमित वैद्यकिय अधिकारी, गट - अ एमबीबीएस यांची नियुक्ती करण्याबाबतचे निवेदन गोबरवाहीचे माजी सरपंच कृष्णकांत बघेल यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व आरोग्य प्रमुखांना दिले होते. आरोग्य विभागाने बघेल यांना पत्र पाठवून माहिती दिली की, ३३ आरोग्य केंद्राकरिता ६६ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी पद मंजूर आहेत. ४३ पदे भरलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात एक स्थायी एमबिबीएस डॉक्टर देता येवू शकते. मात्र नियोजनाअभावी वर्षानुवर्ष स्थायी वैद्यकीय अधिकारीची जागा रिक्त ठेवल्या जात आहे. त्या ठिकाणी बीएएमएसची प्रतिनियुक्तीवर आणि प्रभार सोपवून वेळ मारून नेली जात आहे.

सुविधांचा बोजवारा
वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्याचा फटका रुग्णांना तर बसतोच. मात्र औषधांचा तुटवडा उपलब्ध नसल्यास आर्थिक भुर्दंडही रुग्णांना बसत असतो. गामीण भागात आजही आरोग्य सुविधांची वानवा आहे. यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गोबरवाही येथे तालुक्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र त्यात नियमित गट अ चे वैद्यकीय अधिकारी गत एक वर्षापासून नाही त्यामुळे प्रभारीच्या खांद्यावर येथील कारभार सुरु आहे. परिणामी परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही, या समस्येकडे लक्ष वेधण्याकरिता शासन स्तरावर निवेदन पाठविण्यात आले.
-कृष्णकांत बघेल, माजी सरपंच, गोबरवाही.

Web Title: The management of the health center is on the shoulders of the person in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य