व्यवसायासाठी मुद्रा कर्ज विनाअट उपलब्ध करू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:00 AM2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:53+5:30

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी मनिषा कुलसुंगे उपस्थित होत्या.

Make Money Loan Available For Business | व्यवसायासाठी मुद्रा कर्ज विनाअट उपलब्ध करू द्या

व्यवसायासाठी मुद्रा कर्ज विनाअट उपलब्ध करू द्या

Next
ठळक मुद्देसुनील मेंढे : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वत:चा व्यवसाय उभारू इच्छिनाऱ्या गरीब, गरजू व होतकरू तरूणांना बँकांनी स्वत: पुढाकार घेवून विनाअट मुद्रा कर्ज उपलब्ध करून द्यावे, छोटे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना बँकांनी संपर्क करून मुद्रा योजनेत व्यवसाय उभारण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश खासदार सुनील मेंढे यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुनेश्वरी एस., उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी मनिषा कुलसुंगे उपस्थित होत्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत यावर्षात ५७१० प्रकरणात ६८ कोटी ६९ लाख रूपयांचे कर्ज वितरित करण्यात आल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. खासदार मेंढे यांनी कर्ज वितरणाचा बँकनिहाय आढावा घेतला. मुद्रा योजनाही महत्वकांक्षी योजना होती. या योजनेचा अर्ज प्रत्येक बँकेत उपलब्ध ठेवावा. दर्शनी भागात योजनेचा फलक लावण्यात यावा, बँकांनी कुणाची अडवणूक करू नये आणि मुद्रा कर्ज प्रकरण सात दिवसात मंजूर करावे, अशी सूचना त्यांनी दिली आहे.
या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तावर चर्चाकरून कायम करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायक योजना, प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण पेयजय योजना, प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना, एकात्मिक पानलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय भूमिअभिलेख व्यवस्थापन कार्यक्रम, ग्रामीण ज्योती योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ अभियान आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सदस्यांनी आपल्या भागातील विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर कार्यवाही करण्याची सूचना खासदार मेंढे यांनी दिली.

कर्जमुक्ती योजनेत ३५ हजार शेतकरी पात्र
महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात ३५ हजार ३३२ शेतकरी पात्र ठरले आहे. त्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अशोक कुंभलवार यांनी दिली. ही संख्या दोन लाखापेक्षा कमी कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची आहे. यावर खासदार सुनील मेंढे यांनी दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकºयांना कर्जमुक्ती देण्यात यावी, असा ठराव या बैठकीत मांडला आणि तो एकमताने मंजूर झाला.

रेती चोरीला आळा घाला
रेतीअभावी घरकुलांच्या कामांची गती मंदावली आहे. यासंदर्भात संबंधित यंत्रणेने त्वरीत कारवाई करावी, असे निर्देश खासदार मेंढे यांनी दिले. रेतीचोरीला आळा घालावा, रेतीघाटांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी संस्था नेमण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. सरकारी बांधकामासाठी रेतीघाट राखीव ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: Make Money Loan Available For Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.