लॉकडाऊनचा वनविभागाच्या नर्सरीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:00 AM2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:46+5:30

सिहोरा परिसरात वन विभाग कार्यालय अंतर्गत नद्यांचे काठ आणि शासकीय जागेत वृक्ष लागवड गत वर्षात करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करण्यात आले होते. या नियोजनात जतन आणि संवर्धनावर खर्चाची तरतूद करण्यात आली होती.

Lockdown hits Forest Department nursery | लॉकडाऊनचा वनविभागाच्या नर्सरीला फटका

लॉकडाऊनचा वनविभागाच्या नर्सरीला फटका

Next
ठळक मुद्देपाण्याअभावी अनेक झाडे कोमेजली : देवसर्रा येथील अनेक वृक्ष झाले नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : वनविभागाने पर्यावरण संतुलनासाठी अनेक योजना अंतर्गत सिहोरा परिसरात शासकीय जागेत वृक्ष लागवड केली आहे. परंतु लॉकडाऊन कालावधीत या वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्यात आले नाही. यामुळे अनेक झाडे नष्ट झाली आहेत.
सिहोरा परिसरात वन विभाग कार्यालय अंतर्गत नद्यांचे काठ आणि शासकीय जागेत वृक्ष लागवड गत वर्षात करण्यात आली आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत या वृक्ष लागवडीचे नियोजन तयार करण्यात आले होते. या नियोजनात जतन आणि संवर्धनावर खर्चाची तरतूद करण्यात आली होती. परंतु उन्हाळ्याच्या महिन्यात कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्याकरिता लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यानंतर एप्रिल महिन्यात कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. या महिन्यात बहुतांश शासकीय कार्यालय बंद करण्यात आली. घराबाहेर नागरिक आणि मजुरांचे बाहेर पडणे बंद झाल्याने वनविभागाचे यंत्रणेने फिरकणे बंद केले होते. यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या नर्सरीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या कालावधीत लागवड वृक्षांना पाणी वाटप, केरकचरा काढणे, खत आणि जतन करण्यात आले नाही.
या कालावधीत मजूर मिळणे कठीण होते. यामुळे लॉकडाऊनचा फज्जा या नर्सरींना बसला आहे. देवसर्रा गावाचे हद्दीत असणाऱ्या राठी विद्यालयाचे मागील भागात तयार नर्सरीत एकही झाड जीवंत नाही. ही नर्सरी कंत्राटदाराने तयार केली आहे. परंतु मजूर मिळाले नसल्याने झाडांना पाणी देण्यात आले नाही. याशिवाय हरदोली गावांचे गाव शिवार हद्दीत तयार नर्सरीत सागवन रोपवन तयार करण्यात आले आहे. ही झाडे केरकचऱ्यांनी तुंबली आहेत.
मजुरांचा तुडवडा आणि लॉकडाऊनमुळे झाडांचे जतन आणि संवर्धन अडले आहे. फिजीकल डिस्टन्सिंग अंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करण्याचे सांगण्यात येत असले तरी ग्रामीण भागात कुणी ऐकायला तयार नाहीत. रोहयो कामावर फिजीकल डिस्टन्सिंग पूर्णत: फज्जा उडाला असून लॉकडाऊनमुळे वनविभागाचे नर्सºया कोमेजल्या आहेत.

Web Title: Lockdown hits Forest Department nursery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.