शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पतिवियोगात पत्नीनेही संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: September 2, 2015 00:20 IST

तालुक्यातील सामेवाडा येथील एका नवविवाहितेची आत्महत्येची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे

समाजमन गहिवरले : सामेवाडा येथील घटनालाखनी : तालुक्यातील सामेवाडा येथील एका नवविवाहितेची आत्महत्येची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. पतिनिधनानंतर जगायचे कोणासाठी व कसे हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रेमविवाहामुळे माहेरची नाड तुटल्यामुळे त्या तरुणीने कीटकनाशक प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.सामेवाडा येथील २४ वर्षीय प्रमोद सहादेव भांडारकर याने डिसेंबर २०१४ मध्ये लाखोरी येथील नीतू भदाडे या २० वर्षीय तरुणीसोबत साकोली येथील लहरीबाबा मठात विवाह केला होता. त्यानंतर विवाहाला कायदेशीरपणा प्राप्त व्हावा यासाठी वकिलामार्फत नोटरी केली. नीतू ही प्रमोदच्या चुलत मामाची मुलगी आहे. दोघांच्या प्रेमाचे रुपांतर विवाहात झाले होते.प्रमोदच्या वडिलांकडे अर्धा एकर शेती आहे. प्रमोद मजुरी करुन पोट भरायचा. सुखाचा संसार सुरु असतानाच नियतीने घात केला. २० आॅगस्टला प्रमोदचा काविळने मृत्यू झाला. दु:खाची कुऱ्हाड नीतूवर कोसळली. नीतू तीन महिन्यांची गर्भवती होती. अशातच प्रमोदचे जाने नीतूला चटका लावून गेले. प्रमोद नीतूच्या विवाहाला विरोध होता. प्रमोदच्या अंतयात्रेला ते आले नाही. पतिवियोगाचे दु:ख नीतू पेलू शकले नाही. सरती शेवटी नीतूनेही विषारी कीटकनाशक प्राशन करुन जगाचा निरोप घेतला. सात जन्माच्या आणाभाका घेतलेल्या पत्नीने पतीच्या पाठोपाठ जाणे पसंत केले. विषारी द्रव्य घेतल्याचे लक्षात येताच तिला लाखनीत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. प्रेमाच्या आणाभाका करणाऱ्यांच्या आयुष्याचा असा शेवट झाल्याने समाजमन हळहळत आहे. (तालुका प्रतिनिधी)