शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेला अखेरची घरघर

By admin | Updated: June 8, 2015 01:08 IST

कोंढा येथील पाणी पुरवठा योजनेला अखेरची घटका लागली असून नागरिकांना तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ठिकठिकाणी जलवाहिणी फुटलेली आहे.

कोंढा कोसरा : कोंढा येथील पाणी पुरवठा योजनेला अखेरची घटका लागली असून नागरिकांना तीन दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. ठिकठिकाणी जलवाहिणी फुटलेली आहे. जलवाहिणी दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतच्या नाकीनऊ आले आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे.कोंढा हे सात ते आठ हजार लोकवस्तीचे मोठे गाव आहे. लोकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्यासाठी ३० वर्षापूर्वी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली. गावाला या योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या दरम्यान गावांची लोकसंख्या वाढली. पाण्याची कमतरता निर्माण झाली. बोअर मारून पाणी देण्याचा प्रयत्न झाला. लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने शासनाने लाखो रुपये तसेच ग्रामपंचायतचा लाखो रुपयाचा निधी खर्च झाला. पण पाण्याची समस्या जैसे थे आहे. (वार्ताहर)मुख्य विहीर कोरडी, तळ्यातच नाही तर मळ्यात कशी येईल?भंडारा - पवनी राज्यमार्गावर गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य विहीर आहे. सध्या ही विहीर पूर्ण कोरडी पडली आहे.चार- पाच दिवसातून विहिरीत पाणी जमा होते. या विहिरीवरून कोसरा गावाला देखील पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी मुख्य विहीर पूर्ण कोरडी पडली. कल्पना चावला अध्यापक विद्यालय जवळील पंप तसेच डॉ.विश्वास यांच्या घराजवळील पंप याद्वारे लोकांना पिण्याचे पाणी दिले जात होते. तरीदेखील पाण्याची समस्या सुटत नाही, असे लक्षात आल्यानंतर जीवन जिभकाटे यांच्या घराजवळ मे महिन्यात बोअर करून पंप तयार केले. तरी देखील कोंढा येथील पाणी समस्या सुटली नाही. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या आहे. येथील नळाला पिण्याचे पाणी येतच नाही. आले तर अत्यल्प. त्यामुळे या वॉर्डातील नागरिकांना शेतातील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. वॉर्ड क्रमांक ३ मधील महिलांनी पिण्याचे पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतवर अनेकदा घागर मोर्चा काढला. पण तळ्यातच नाही तर मळ्यात कशी येईल. या म्हणीप्रमाणे पाणीच नाही तर मिळेल कुठून? असा प्रश्न पडला आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्याने पुन्हा गावात पाणी समस्या वाढली आहे.येथील नळयोजनेची जलवाहिणी जीर्ण झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी फुटते. दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपये ग्रामप्रशासनाचे रुपये खर्च होत आहे. एक मोटरपंप खरेदी करण्यााठी पदाधिकारी भंडारा, नागपूर येत जात आहे. पण पिण्याच्या पाणी समस्येवर तोडगा निघू शकत नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोंढा गावाची पाणी समस्या हा मुख्य विषय राहणार आहे. सामान्य जनता मात्र पिण्याचे पाणीसाठी भटकत आहे. सध्या तीन दिवसातून पाणी मिळत आहे. ही समस्या दूर होण्याची वाट गावकरी पाहत आहे.