रमाई घरकूल योजनेचे लक्षावधींचे अनुदान अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:46+5:30

अनुदान राशीकरिता चांदपुर येथील लाभार्थ्यांनी सरपंचाकडे याबाबत विचारपूस केली आहे. मात्र चांदपूर गावातीलच नव्हे तर सिहोरा परिसरातील गावात लाभार्थ्यांना रमाई आवास घरकूल योजनेंतर्गतचा निधी मिळालेला नाही. घरकुल लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात टाकण्यात येत असल्याने यामध्ये ग्रामीण स्तरावर कुणाचाही हस्तक्षेप होत नाही.

Lakhs of grants for Ramai Gharkool scheme were blocked | रमाई घरकूल योजनेचे लक्षावधींचे अनुदान अडले

रमाई घरकूल योजनेचे लक्षावधींचे अनुदान अडले

Next
ठळक मुद्देलाभार्थी त्रस्त : पंचायत समिती कार्यालयात वारंवार हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : कोरोना संसर्गाचा फटका बसल्याने शासनाकडून विविध योजनांच्या निधीमध्ये कपात करण्यात येत आहे. तुमसर तालुक्यात घरकुल योजनेचे लक्षावधी रूपयांचे अनुदान अडल्याने लाभार्थी कार्यालयाचे हेलपाटे मारत आहे. घरकूल लाभार्थ्यांनी पैशाची उसणवार करीत घराचे बांधकाम केले, मात्र घरकुलाचे हप्ते थकीत असल्याने लाभार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अनुदान राशीकरिता चांदपुर येथील लाभार्थ्यांनी सरपंचाकडे याबाबत विचारपूस केली आहे. मात्र चांदपूर गावातीलच नव्हे तर सिहोरा परिसरातील गावात लाभार्थ्यांना रमाई आवास घरकूल योजनेंतर्गतचा निधी मिळालेला नाही. घरकुल लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात टाकण्यात येत असल्याने यामध्ये ग्रामीण स्तरावर कुणाचाही हस्तक्षेप होत नाही. मात्र लाभार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून अनेकजणांकडून ग्रामीण स्तरावर निधी रोखून धरल्याच्या तक्रारी होत आहे. घरकुलाचे बांधकाम करतांना अनेकांनी वाळू, रेती, सिमेंट व बांधकाम साहित्य घेण्यासाठी उसणवार तसेच प्रसंगी सावकाराची मदत घेतली आहे. त्यामुळे आता पैशासाठी अनेकांचा तगादा वाढला असल्याचे घरकूल लाभार्थ्यांनी सांगितले.
नेक दुकानदारांचे देणे थकीत असल्याने दुकानदारांकडूनही तगादा सुरु आहे. त्यामुळे घरकूल लाभार्थ्यांना इकडे आळ तिकडे विहिर अशी अवस्था झाली आहे. चांदपूर येथील धनराज भोयर यांना घरकुलाचे तीन टप्यातील अनुदान राशी प्राप्त झाली आहे. अंतिम टपा मिळाला नसल्याने घरकूल बांधकाम अद्यापही अर्धवट आहे.
गेल्या गत चार महिन्यातपासून त्यांना शेवटचा हप्ता मिळाला नसल्याने पंचायत समितीत वारंवार विचारणा करण्यात येत आहे. अशिक्षीत असल्याने पुरेशी माहिती दिली जात नाही. मात्र गावातील सरपंचांना घरकुलाचा हप्ता प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे भोयर यांच्यासह परिसरातील घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते त्वरित देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.

चांदपूर येथील लाभार्थ्यांचे घरकूल अनुदान अडले आहे. पावसाळा सुरु झाल्याने अनुदान त्वरित दिले पाहिजे. मात्र हा विषय प्रशासनाच्या अख्त्यारित येतो.
- उर्मिला लांजे,
सरंपच चांदपूर

Web Title: Lakhs of grants for Ramai Gharkool scheme were blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.