शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित गावात सुविधांचा अभाव

By admin | Updated: July 23, 2014 23:28 IST

गोसीखर्दु प्रकल्पात गेलेल्या तालुक्यातील खमाटा व टाकळी या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र शासनाने पुनर्वसित गावात सोयी सुविधा पुरविले नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण धोक्यात आले

भंडारा : गोसीखर्दु प्रकल्पात गेलेल्या तालुक्यातील खमाटा व टाकळी या गावांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र शासनाने पुनर्वसित गावात सोयी सुविधा पुरविले नसल्याने येथील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण धोक्यात आले असून नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा व्हावी याकरीता गोसीखुर्द प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यात खमाटा व टाकळी या गावांचेही लावेश्वर मोड ते कोथुर्णा मार्गावर चार वर्षापुर्वी केले. मागील चार वर्षापासून पुनर्वसीत ठिकाणी या गावचे नागरिक वास्तव्य करीत आहे. मात्र शासनाकडून त्यांना देण्यात आलेल्या सोयी सुविधांच्या आश्वासनाची अजुनही पुर्तता करण्यात आलेली नाही. केवळ आश्वासनांच्या भरोवशावर येथील नागरिक मिळालेल्या रकमेवर वास्तव्य करीत आहे. मात्र यातील काही सुविधांचा अजुनही अभाव आहे. या पुनर्वसीत गावात रस्ते, सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली, विजेची व्यवस्था नसल्याने नागरिक या सुविधांपासून वंचित आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाची भव्य वास्तू व शाळेची इमारत बांधण्यात आली असली तरी तेथे आवश्यक सुविधा नसल्याने येथील नागरिक व विद्यार्थ्यांना अन्यत्र पायदळी जावे लागते. गावात सार्वजनिक शौचालय, मुत्रीघराची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुनर्वसीत गावकऱ्यांना अत्यावश्यक असलेल्या या सर्व सोयींची पुर्तता त्वरीत करून त्यांना मदत करावी, अशी मागणी ओबीसी संग्राम परिषदेचे उमेश मोहतुरे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)