सुविधांअभावी रुग्णसेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:46+5:30

कोंढा येथील आरोग्य केंद्र अनेक पुरस्कार प्राप्त केंद्र आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहेत. ३१ ऑक्टोबरला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या केंद्रात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल बोरकर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर सर्व जबाबदारी आली आहे.

Lack of facilities for patient service collapsed | सुविधांअभावी रुग्णसेवा कोलमडली

सुविधांअभावी रुग्णसेवा कोलमडली

Next
ठळक मुद्देकोंढा प्राथमिक आरोग्य केंद्र : डॉक्टरांचेही रिक्त पद तातडीने भरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. अ‍ॅब्युलन्स नेहमी आजारी यासह सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील रुग्णसेवा कोलमडली आहे.
कोंढा येथील आरोग्य केंद्र अनेक पुरस्कार प्राप्त केंद्र आहे. येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहेत. ३१ ऑक्टोबरला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर लेपसे सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या केंद्रात एकमेव वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल बोरकर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्यावर सर्व जबाबदारी आली आहे.
जवळपास ५६ गावाच्या आरोग्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रावर आहे. येथे दररोज ओपीडीमध्ये उपचारासाठी १०० ते २०० रुग्ण येथेत येत असतात. त्यांच्यावर उपचार करणे, एखादेवेळी आकस्मिक रुग्ण उपचारासाठी येथे अनेकदा येत असतात. आठ दिवसापूर्वी कोंढा येथे वॉर्ड क्रमांक २ व ३ मध्ये अतिसाराची लागण झाली. तेव्हा त्या रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले. अशावेळी या केंद्रात दुसरे वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्त पद देणे गरजेचे आहे. तसेच या केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया गर्भवती महिलांवर उपचार व त्यांची प्रसूती येथे केली जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांवर अनेक उपचार केले जात असते. येथे एक वैद्यकीय अधिकाºयांचे रिक्त पद भरणे आवश्यक आहे. आरोग्य कर्मचाºयांची रिक्त पदे आरोग्य केंद्रात कारकून, आरोग्य सेवक, परिचारिका अशी अनेक पदे रिक्त आहेत. त्यांचा भार कर्मचाऱ्यांवर येत आहे. या केंद्रातील अ‍ॅम्बुलन्स अनेक महिन्यापासून आजारी आहे. त्यामुळे रुग्णांना भंडारा, नागपूरला उपचारासाठी नेण्यास अडचण जात आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तसेच प्रसूती झालेल्या महिला रुग्णांना घरी सोडण्यास अडचण जात आहे. येथे नवीन रुग्णवाहिका या केंद्रास देणे आवश्यक आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार नरेंद्र भोंडेकर, पवनी तालुका शिवसेनाप्रमुख विजय काटेखाये यांनी आरोग्य केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका व येथे औषधीचा पुरवठा करण्याचे निवेदन जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले होते. तसेच गावातील अनेक नागरिकांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर यांना या समस्येकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. कोंढा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रिक्त एक वैद्यकीय अधिकारी, नवीन रुग्णवाहिका व औषधी पुरवठा त्वरीत करण्याची मागणी कोंढा व परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींनीकडे केली आहे.

Web Title: Lack of facilities for patient service collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.