शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ंपूर्वजांच्या आठवणी वृक्षरूपाने जपा

By admin | Updated: June 5, 2015 00:55 IST

आपल्या पूर्वजांंच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण श्राध्द करतो, मात्र त्यांच्या आठवणी कायमस्वरुपी आपल्यासोबत रहाव्यात म्हणून त्यांच्या नावाने वृक्षलागवड करावी ...

भंडारा : आपल्या पूर्वजांंच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण श्राध्द करतो, मात्र त्यांच्या आठवणी कायमस्वरुपी आपल्यासोबत रहाव्यात म्हणून त्यांच्या नावाने वृक्षलागवड करावी आणि पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी यांनी येथे केले.माजी केंद्रीयमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ३ ते ९ जून हा आठवडा पर्यावरण सप्ताह म्हणून राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने मानेगाव (बाजार) येथे आयोजित कार्यक्रमात वंजारी बोलत होत्या. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद सदस्या ज्योती टेंभुर्णे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जेजूरकर, सरपंच गभणे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, तहसीलदार सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, गट विस्तार अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होत्या. आपल्या पुढच्या पिढीसाठी संचीत म्हणून आपण पाणी साठवून ठेवण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवायला सुरुवात केली आहे. गावातील सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घेवून आपल्या श्रमाचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी यावेळी ज्यांच्याकडे फारसे लक्ष गावातील लोक देत नाहीत ज्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसामान्य लोकही काही करत नाही, अशा गरिबांसाठी पंतप्रधानांनी तीन योजना सुरु केल्यात. त्या योजनांचा लाभ गावातील सर्व लोकांनी घ्यावा, असे आवाहन अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. गावकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने शेतीचा खर्च कमी करुन उत्पादनामध्ये वाढ केली तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत निश्चितच बदल होईल. त्याचबरोबर दुबार पीक घेण्यासाठीसुध्दा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. शासकीय योजनांचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे आणि जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी वृक्षारोपण करुन पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ केला. याप्रसंगी विदर्भ- कोकण ग्रामीण विकास बँकेचे व्यवस्थापक यांनी अनेक योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली. कृषी विभागाने कृषी योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. संचलन विस्तार अधिकारी हुमणे तर आभारप्रदर्शन सरपंच गभणे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)