शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कार्तिक ठरला संगणक प्रमाणपत्र धारक पहिला नाथजोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:36 IST

लाखांदूर : हस्तरेषा पाहून उदरनिर्वाह करण्याच्या परंपरागत व्यवसायातही त्याने शिक्षणाचे वेड जोपासले. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तो पदवीचे शिक्षण ...

लाखांदूर : हस्तरेषा पाहून उदरनिर्वाह करण्याच्या परंपरागत व्यवसायातही त्याने शिक्षणाचे वेड जोपासले. प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तो पदवीचे शिक्षण घेत असतांनाच एमएससीआयटी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होऊन नाथजोगी समाजातील पहिला संगणक प्रमाणपत्र धारक ठरला आहे. ही यशोगाथा आहे लाखांदूर तालुक्यातील कोदामेढी येथील कार्तिक मोहनलाल वडस्कर (२४) नामक नाथजोगी युवकाची.

नाथजोगी समाजात जन्मलेल्या या युवकावर बालपणात गावोगावी भटकून भिक्षा मागण्याचे वंशपरंपरागत संस्कार होत असतानाच त्याला शिक्षणाची आवड निर्माण झाली. ही आवड जोपासताना त्याला कुटुंबीयांनीदेखील सहकार्य केले. रुढी परंपरांच्या जोखड़ातून बाहेर पडताना त्याने बालविवाह न करता या समाजात जागृतीचे जणू पहिले पाऊल टाकले. सध्या तो बी.ए.पदवी चे दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत असून नुकताच एमएससीआयटी संगणक परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याने अनेकदा पालावरची शाळा भरवून या समाजातील लहान मोठ्यांना शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे. वर्षानुवर्षापासून परंपरागत व्यवसाय, अनिष्ठ रूढीपरंपरांना मूठमाती देत या युवकाने शिक्षणाचे वेड जोपासत स्वत:समाजात शैक्षणिक क्रांतिसाठी धडपड करून नाथजोगी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नरत या युवकाला शासन प्रशासनाच्या पुढाकाराची गरज असल्याचे सर्वत्र बोलले जात असून त्याचे कौतुकही केले जात आहे.