शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन साधनांची मालकी प्रस्थापित करणे महत्त्वाचे

By admin | Updated: May 8, 2017 00:27 IST

भांडवलदारी खाजगी मालकीचा अंतकरुन उत्पादन साधनांची सामाजिक मालकी प्रस्थापित करणे हाच समतेच्या लढ्याचा कार्लमार्क्स यांनी सांगितलेला खरा मार्ग आहे ....

कार्ल मार्क्स जयंती : हिवराज उके यांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भांडवलदारी खाजगी मालकीचा अंतकरुन उत्पादन साधनांची सामाजिक मालकी प्रस्थापित करणे हाच समतेच्या लढ्याचा कार्लमार्क्स यांनी सांगितलेला खरा मार्ग आहे असे प्रतिपादन कार्ल मार्क्स यांच्या जयंतीप्रसंगी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी केले आहे. कामगार वर्गाचा क्रांतीकारक गुरु कार्ल मार्क्स यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त ५ मे रोजी राणा भवन, भंडारा येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा शांताबाई बावनकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे अध्यक्ष सदानंद इलमे, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या डॉ. सुमन आराटे यांचे मार्गदर्शन झाले. मार्क्सवादी तत्वज्ञानाबाबत बोलतांना हिवराज उके म्हणाले, जगप्रसिध्द भांडवल या ग्रंथात वरकळ मुल्यांचा सिध्दांत मांडून भांडवलदारी शोषणाविरुध्द कामगार चळवळीला शास्त्रशुध्द आधार देत आपल्या कम्युनिष्ट जाहिरनाम्यात जगातील कामगारांनो एक व्हा ही घोषणा बुलंद केली. याच मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या आधारावर लेनिन यांनी सोविएत रशियामध्ये महान आॅक्टोबर समाजवादी क्रांती घडवून आणली. व अवघ्या १३ वर्षात गरीबी आणि बेकारी नष्ट केली. भारतालाच नव्हेतर अनेक नवस्वतंत्र देशांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास सर्व प्रकारची मदत केली व हिटलरशाहीचा अंत केला.सदानंद इलमे म्हणाले की, मार्क्सवाद- लेनिनवादाच्या सिध्दांताने शोषणविहीन समताधिष्ठीत सामाजिक व्यवस्था निर्माण होवू शकते या साठी सर्व पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचारांच्या शक्तींनी व किसान कामगार कष्टकऱ्यांनी आणि बेरोजगार युवक विद्यार्थ्यांनी संघटीत होऊ न संघर्ष केला पाहिजे असे आवाहन ही इलमे सरांनी केले. या प्रसंगी झुलनाबाई नंदागवळी यांनी ‘लहा उद्याची सकाळ आता श्रमिकांच्या नावे’ हे क्रांतीगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे उपाध्यक्ष स्वप्नील भोवते यांनी केले. आभार गजानन पाचे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने मोहनलाल शिंगाडे, जगतलाल अंबुले, रत्ना इलमे, वामनराव चांदेवार, सुरेश नागोसे, गौतम भोयर, श्रीवंता अंबुले, ताराचंद देशमुख, गोपाल चोपकर, राजकुमार मेश्राम यांचा समावेश होता.