शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: April 27, 2017 00:34 IST

दाम दुप्पट पैसे करून देण्याच्या नावावर आर्थिक फसवणूक करणाऱ्या जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कंपनीची संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांची रक्कम त्यांना देण्यात यावी,....

मुख्यमंत्र्यांना निवेदन : प्रकरण जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडियाचेभंडारा : दाम दुप्पट पैसे करून देण्याच्या नावावर आर्थिक फसवणूक करणाऱ्या जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कंपनीची संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांची रक्कम त्यांना देण्यात यावी, बाहेर असलेल्या आरोपींना अटक करण्यात यावी, ज्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे तिथे गुन्हे दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात यावे, या मागण्यांसाठी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी सामाजिक कार्यकर्ते विष्णूदास लोणरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलन केले. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे अहवाल पाठविला होता. त्या अहवालानुसार कारवाई करण्यात यावी, असेही आंदोलकांचे म्हणने आहे. जे.एस.व्ही. कंपनीने दाम दुप्पट करून देण्याच्या नावावर आर्थिक फसवणूक केली आहे. रक्कम परत मिळावी म्हणून उपोषण, धरणे केले. ८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून गृह राज्यमंत्री दीपक केसकर यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी संचालकांची संपत्ती जप्त करून गुंतवणूकदारांचे रक्कम परत करण्याचे तसेच सर्व गैरअर्जदारांना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांना जे.एस.व्ही. कंपनीच्या संचालकांची संस्थेच्या नावाने असलेली मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव पाठविला. ती मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थामधील) हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार संपत्ती जप्त करून ग्राहकांची रक्कम मिळण्यात यावी, म्हणून मालमत्ता जप्तीचे आदेश व अधिसूचना मिळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला केली आहे. ५ डिसेंबरपासून कारवाई न झाल्यामुळे पिळवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात मधुकर येरपुडे, ज्ञानेश्वर निकुरे, शामलाल काळे, रमेश बोंदरे, टेकराम मेश्राम, सूरज कुथे, केशवराव बिसने, कन्हैया नागपुरे, विक्रांत तिडके, सलीम पठाण, कल्पना जावळकर, वनिता चवळे, अनिता भुरे, चंद्रभागा कोळवते, छाया राऊत, शैलेश बोंदरे, अविनाश बेलेकर, गिरीधर गभने, प्रमोद येल्लजवार, नुजहत शेख, मकबुल वारशी, वर्षा बोंदरे व गुंतवणूकदार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)