शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कुपठे बीट पॅटर्नची राज्यात अंमलबजावणी

By admin | Updated: November 28, 2015 01:45 IST

शिक्षणाचा अधिकार सन २००९ मध्ये प्राप्त झाला. राज्यातील शिक्षण विभागाने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आखूनही विद्यार्थी अप्रगतच राहत होते.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार : जिल्ह्यातून देव्हाडी बीटाची प्रायोगिक तत्वावर निवडमोहन भोयर भंडाराशिक्षणाचा अधिकार सन २००९ मध्ये प्राप्त झाला. राज्यातील शिक्षण विभागाने अनेक प्रशिक्षण कार्यक्रम आखूनही विद्यार्थी अप्रगतच राहत होते. सातारा जिल्ह्यातील कुपठे बीट राज्यात प्रगत झाले. चंद्रपुर जिल्ह्याातील ताडाली बीटने कुपठे बीटचा किला गिरविला. आता राज्यातील इतर शाळांनी या बीटचा कित्ता गिरवावा लागणार आहे. तुुमसर तालुक्यातील देव्हाडी बीटची निवड प्रगत बीटकरिता झाली आहे.कुपठे बीटअंतर्गत ४० शाळेत एकही विद्यार्थी अप्रगत नाही ते बीट राज्यात मॉडेल झाले. त्याच धर्तीवर चंद्रपुर जिल्ह्याातील ताडाली बीट प्रगत झाले. यांचा कित्ता राज्यातील इतर जिल्ह्याातील बीट प्रगत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी कुपठे बीट पॅटर्न राज्यात राबविण्याचा निर्णय घेऊन तशा सूचना दिल्या. भंडारात नुकतीच त्यांनी भेट दिली. आढावा सभेत त्यांनी भंडारा जिल्ह्यात एक बीट प्रगत करण्याचे निर्देश दिले.डायट, भंडारा तथा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तुमसर तालुक्यातील देव्हाडी बीट प्रगत करण्याचा निर्णय घेतला. या बीट अंतर्गत देव्हाडी, मिटेवानी व येरली केंद्रातील जिल्हा परिषदेच्या ४१ शाळांचा समावेश आहे. येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थी प्रगत करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रगत विद्यार्थी उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती, कार्यशाळा, तंत्रस्रेही कार्यशाळा ज्ञानावर आधारित साहित्य तयार करुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वर्गाची क्षमता, भाषा विषयक क्षमता, विद्यार्थ्यांना वाचन घेणे, गणितातील मूलभुत क्रिया, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आदी येणे आवश्यक आहे. नंतर विद्यार्थ्यांची पटपडताळणी केली जाणार आहे. यासंबंधात डायट भंडाराचे प्राचार्य परिहार यांचे मार्गदर्शनात सभा घेण्यात आली. या बैठकीला जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत नंदनवार, विस्तार अधिकारी भलावी, वंजारी, आर. एस. बांते उपस्थित होते. या उपक्रमात शिक्षकांना सातारा जिल्ह्याातील कुपठे तथा चंद्रपूर जिल्ह्याातील ताडाली येथे पाठवून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थी प्रगत करण्याकरिता शिक्षण विभागाने बराच आटापिटा केला होता. अनेक प्रशिक्षण शिक्षकांना देवून काहीच फायदा झाला नाही. प्रशिक्षण केवळ कागदोपत्री होणे गंभीर आहे. कोणत्याही प्रशिक्षणाचा फायदा होणे गरजेचे आहे. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रगतिसाठी या महत्त्वकांक्षी पॅटर्नची अंमलबजावणी केली असली तरी तो कितपत यशस्वी ठरेल, हे भविष्यात कळेल.