शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरी बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:00 IST

लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा शेतकऱ्यांसाठी केवळ नाममात्र ठरत आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याला मोठी खिंड पडली आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाने अद्यापही त्याची दुरूस्ती केली नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी, सिंचनासाठी होणार हजारो शेतकऱ्यांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील ग्राम बाम्हणी-खडकी येथील दल्ली मार्गालगतच्या कोल्हापुरी बंधाऱ्याची मागील १० वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याचा कसलाच उपयोग शेतकऱ्यांना होत नाही.या बंधाऱ्याची दुरूस्ती करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने या कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे जेव्हापासून हा बंधारा तयार करण्यात आला तेव्हापासून याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी होत नाही. बंधाऱ्यात पाणी साचून राहत नसल्याने हा बंधारा शेतकऱ्यांसाठी केवळ नाममात्र ठरत आहे. या कोल्हापुरी बंधाऱ्याला मोठी खिंड पडली आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाने अद्यापही त्याची दुरूस्ती केली नाही.परिणामी बाम्हणी, खडकी व देवपायली या गावातील शेतकऱ्यांना सिंचनपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी कोल्हापुरी बंधारा तयार केला.यासाठी लाखो रु पये खर्च केले. मात्र आता संबंधित विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे शेतकऱ्यांना गत काही दिवसापासून सिंचनासाठी वंचित रहावे लागत आहे.वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरजहा कोल्हापुरी बंधारा नवेगाव-नागझिरा अभयारण्याला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात पाण्याची सोय तसेच भूजल पातळी वाढविण्यास मदत झाली असती. मात्र यात पाणीच साचून राहत नसल्याने याचा कसलाच उपयोग होत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात