शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बोथली-खोलमारा-तावशी घाटावरून रेतीची अवैध तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

वाळू तस्करी जोमात सुरू आहे. बोथली, खोलमारा, तावशी, मांढळ आदी घाटावरून राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू असली तरी मात्र या तस्करावर कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट येथील तलाठी वाळू तस्करासोबत खुलेआम फिरत असल्याने कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

ठळक मुद्देनदी पात्र ठरले ओस : महसूल विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : गत काही दिवसांपासून नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाला असून पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे नदीचे पात्र ओस पडले आहे. रेतीची तस्करी करणाऱ्यास कोणतीही अडचण होत नसल्याने वाळु माफीयांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आपला मोर्चा नदी घाटावर रात्रीबेरात्री चढविला आहे. वाळू तस्करी जोमात सुरू आहे. बोथली, खोलमारा, तावशी, मांढळ आदी घाटावरून राजरोसपणे वाळू वाहतूक सुरू असली तरी मात्र या तस्करावर कोणतीही कार्यवाही होत नाही. उलट येथील तलाठी वाळू तस्करासोबत खुलेआम फिरत असल्याने कार्यवाही करणार कोण, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.लाखांदूर तालुक्याला चुलबंद नदी वरदान ठरलेली आहे. तर दुसरीकडे हिच नदी वाळू माफियासाठी व महसूल कर्मचाºयांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरल्याचे दिसून येत आहे. बोथली, मांढळ, खोलमारा, तावशी नदीघाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आहे. या घाटाचा अजुनपर्यंत लिलाव झाला नाही. त्यामुळे महसूल कर्मचाºयांना आर्थिक वंशीकरण करून वाळू माफिया या रेती घाटावर हल्ला चढवून रेतीची रात्रंदिवस ट्रॅक्टरद्वारे तस्करी करीत आहेत. याची सर्वस्वी माहिती महसूल कर्मचाºयांना असून दाम करी काम या उक्तीवर असल्याने कानाडोळा होत आहे.या वाळू तस्करीच्या जुुगलबंदीत माफीये व महसूल कर्मचारी मालामाल होत असले तरी शासनाची तिजोरी मात्र खाली होत आहे. ज्याच्या खांद्यावर शासन संपत्तीची रक्षण करण्याची जबदारी सोपविण्यात शासनाने धन्यता मानली तेच महसूल कर्मचारी आर्थिक प्रलोभनाला बळी पडत असून माफियांना वाळू तस्करी करण्यास रान मोकळे करून देण्यात धन्यता मानीत आहेत. अशा कर्मचाºयांवर वरिष्ठांनी कार्यवाही करावी, अशीही जनसामान्यातून बोलले जात आहे.वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित होताच त्या दिवसापुरते महसूल कर्मचारी जागे होतात. मात्र कार्यवाही शुन्य. संबंधित गावात असलेले तलाठ्यांना कोण शासन संपत्तीची चोरी करतो हे चांगले ठाऊक असते. मात्र प्रेमापोटी एक केस ट्रॅक्टर चालकांना मागणे व ती शासनास दाखविणे व बाकी माल डब्ब्यात भरणे असला प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे.तावशी व चिचाळ येथील तलाठी मुख्यालयीन ठिकाणी वास्तव्यास राहत नसून १५ ते २० किमी अंतरावर राहतात. कुणी या चोरट्याची माहिती दिली तर मी बाहेर आहे. येतो एवढेच ऐकायला येत असल्याने व चोरट्यांना संंबंधित कर्मचारी वास्तव्यास नसल्याचे व हित संबंधीत असल्याने कार्यवाही होत नाही. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष घालून मुरूम चोरट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Thiefचोर