शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

माडगी घाटातून रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तलाठी कार्यालय आहे. माडगी हे गाव तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे.

ठळक मुद्देचोरटी वाहतूक : महसूलचे दुर्लक्ष

न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील माडगी (दे) येथील वैनगंगा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु आहे. शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. महसूल प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. तालुका मुख्यालयातून केवळ सात किमी अंतरावर रेतीचा हा गोरखधंदा सुरु आहे.तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. माडगी (दे) येथे नदीपात्रातून राजरोसपणे नियमबाह्य रेतीचा उपसा सुरु आहे. नदीपात्रात ट्रॅक्टरने रेतीचा उपसा करण्यात येतो. गावाबाहेर रेतीची साठवणूक करून स्थानिकस्तरावर रेतीची विक्री सध्या सुरु आहे.तुमसर मुख्यालयापासून सदर रेतीघाट केवळ सात किमी अंतरावर आहे. येथे नदीपात्र विस्तीर्ण असून पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहासोबत अल्प प्रमाणात रेती वाहून आली. त्या रेतीचा येथे उपसा करणे सुरु आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. रेती उपस्यामुळे नदीपात्र येथे पोखरलेले दिसते.माडगी (दे) येथील घाटाचा महसूल प्रशासनाने लिलाव केला नाही. चोरीने रेतीचा उपसा येथे सुरु आहे. रेती माफियांना कुणाचे अभय आहे याची चर्चा परिसरात आहे. अर्थकारणामुळे रेतीचा उपसा सुरु आहे अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. हाकेच्या अंतरावर माडगी (दे) येथे तलाठी कार्यालय आहे. माडगी हे गाव तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे.रस्त्यावरून नदीपात्रात ट्रॅक्टर रेती वाहतूक करताना दिसतात. मात्र महसूल प्रशासनाला ते दिसत नाही. रेती चोरट्यांना महसूल प्रशासनाचे अभय दिसत आहे. रेती माफियांची टोळी संपूर्ण तुमसर तालुक्यात नदीपात्रातून सर्रास रेतीचा उपसा सुरु आहे. मागील पाच वर्षात संपूर्ण नदीपात्र पोखरून टाकण्यात आले, परंतु कारवाई शून्य होती. केवळ थातूरमातूर कारवाई येथे करण्यात आली. महसूल प्रशासन येथे दबावात आहे, अशी चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे.तस्करांवर कारवाई कधी?तुमसर तालुक्यात विस्तीर्ण वैनगंगा, बावनथडी नद्यांचे पात्र आहे. नदीपात्रात मोठे खड्डे पडले आहेत. उपविभागीय अधिकारी कारवाई करणार काय? तुमसर येथे नव्याने उपविभागीय अधिकारी म्हणून नितीन सदगीर रूजू झाले आहेत. नियमानुसार कामे ते करतात अशी त्यांची ओळख आहे. ते तरुण असून ऊर्जावान आहेत. तुमसर व मोहाडी तालुका रेतीच्या चोरीपासून मुक्त करतात काय? हे आव्हान त्यांच्यासमोर आहे. नियम केवळ कागदावर न पाळता प्रत्यक्षात नियमानुसार कारवाई ते करतात काय? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Thiefचोर