शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेच्या काठावरील मातीचे अवैध खनन

By admin | Updated: March 2, 2017 00:15 IST

जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे.

धुळीमुळे वायू प्रदूषणाचीही समस्या : सकाळी ६ वाजतापासून सुरू होते वाहतूक, लाखोंचा महसूल पाण्यातभंडारा : जिल्ह्याला गौणखनिजांचे वरदान असताना तस्करांचीही तेवढीच मेहरनजर या गौणखनिजांवर आहे. भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदी पात्राजवळील स्मशानभुमी परिसरातील सुपीक मातीची खुलेआम वाहतुक केली जात आहे. परिणामी शासनाचा लक्षावधी रूपयांचा महसूल बुडत आहे.पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याला सुपीक असा भुभाग लाभलेला आहे. गोसीखर्द धरणाच्या अस्तित्वानंतर जीवनदायिनी वैनगंगा नदीच्या भरोश्यावर बारमाही पिकेही घेतली जातात. वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्याला वळसा घालुन वाहते. नदी प्रवाहीत होत असताना एकीकडे वहन तर दुसऱ्या बाजुला संचयनाचे कार्य करित असते. त्यामुळे वैनगंगा नदीपात्रातही वाळूच्या रूपाने अमुल्य देणगी या जिल्ह्याला मिळाली आहे. संचयन कार्यामुळे तेवढीच सुपीक जमीनही नदीकाठावर आहे. परिणामी प्रचंड उत्पादन क्षमता असलेल्या व शासकीय मालमत्ता असलेल्या या जमीनीवरील मातीचे मोठ्या प्रमाणात खणन केले जात आहे. नदी काठावरील हिंदु स्मशानभूमी ते पश्चिम दिशेला जवळपास शंभर मीटर परिसरात तस्करांनी मातीचे खणन करायला सुरूवात केली आहे. यासाठी नदीकाठावर जाण्यासाठी कच्चा रस्ताही तयार करण्यात आला आहे. ट्रॅक्टर थेट नदीकाठापर्यंत नेण्यात येते. मजुरांच्या साह्याने नदीकाठावरील सुपीक मातीचे खणन करून ट्रॅक्टर टालीत भरण्यात येते. सकाळी ६ वाजतापासूनच या कामाला सुरूवात होते. महसूल प्रशासनासह खनिकर्म विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. माती घरबांधकामासाठी अथवा ले-आऊट समतल करण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती आहे. फुकटच्या सुपीक मातीवर तस्कर लाखोंची कमाई करीत आहे. (प्रतिनिधी)