शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
3
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
7
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
8
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
9
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
11
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
12
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
13
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
14
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
15
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
17
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
18
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
20
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

मने बदलली.. अन् मतेही..!

By admin | Updated: October 20, 2014 23:07 IST

राज्यातील आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही आघाडी सरकारच्या काळात झालेले घोटाळे, भ्रष्टाचाराचा कहर यामुळे सामान्य नागरिकांमध्ये

भंडारा : राज्यातील आघाडी शासनाने केलेली कामे, राबविलेल्या योजना कल्याणकारी असल्या तरी या योजनांपेक्षाही आघाडी सरकारच्या काळात झालेले घोटाळे, भ्रष्टाचाराचा कहर यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष संघटीत करण्याचे काम भाजपने केले. सोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या झंझावाती प्रचार संपूर्ण राज्य ढवळून निघाला. वारूळातून मुंग्या बाहेर पडाव्यात, तशा स्वरूपात ईव्हीएममधून मते बाहेर पडली. ही सारी किमया एका दिवसात झालेली नाही. लोकसभेतील पराभवानंतर लोकांची मने जुळविण्याचे काम व्हायला पाहिजे होते, तसे झाले नाही. उलट आघाडी शासनाविरुद्ध लोकांच्या मनामध्ये असंतोष उफाळू लागला. उलट मोदी यांच्या कामांची चर्चा होऊ लागली. बदललेल्या मनांवर जात-पात या विचारधारांचा प्रभाव पडला नाही. परंतु मने बदलली आणि मते बनली, मते ठाम राहिली व चमत्कार घडला यातून भंडारा जिल्हाही सुटला नाही. भंडारा जिल्ह्यात भाजपने मिळविलेल्या मताधिक्याचा विजय हा केवळ अशा बदललेल्या मनांचा परिणाम आहे. ही मने फक्त उमेदवारांसाठी निश्चितच बदलली नाहीत तर परिवर्तनासाठी झालेले हे मन परिवर्तन आहे, हे आता सर्वच मान्य करीत आहेत.यावेळी सर्वच पक्ष स्वतंत्ररित्या लढूनही मुस्लिम आणि दलित मतांची मोट काँग्रेस व राष्ट्रवादीला बांधता आली नाही. उलट आघाडी शासनाचा भ्रष्टाचार भाजपने जनतेला पटवून देऊन सारेच मोदी लाटेवर तरले. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावूनही ‘घडी’ नीट बसली नाही, अस्तित्वाच्या लढाईत काँग्रेस श्रेष्ठीनेही ‘हाथ’ झटकले. भंडारा जिल्ह्यात त्या-त्या विधानसभा क्षेत्रात समाजनिहाय एकजूट झाली, परंतु एकाच समाजातून अधिक उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतांचे विभाजन झाले, हे एकदाचे मान्य करता येईल. परंतु विजयी उमेदवारांना मिळालेले मताधिक्य हे केवळ एकाच समाजाच्या एकजुटीचे नव्हते, हेसुद्धा या निकालावरुन मान्य करावेच लागणार आहे.या निवडणुकीत ‘मोदी’ लाट होती, हे निकालच सांगतात, मात्र या लाटेमागील कार्यकारणभाव लक्षात घेणे गरजेचे आहे. मतदार जागृत झाले आहेत. आता त्यांना गृहीत धरता येणार नाही. आज ते तुमच्यासोबत असले तरी ईव्हीएमपर्यंत त्यांची मते बदलू शकतात, हे विसरता येणार नाही. लोक बोलत नाहीत तर करून दाखवितात, याचे प्रत्यंतर यानिमित्ताने समोर आले आहे. या निवडणुकीत हवा निर्माण करणाऱ्यांना मतदारांनी सपेशल नाकारले. भंडारा विधानसभा क्षेत्रात शिवसेना सोशल मिडीयावर दिसली. परंतु ते मात्र ‘सोशल’ झाले नाहीत. लोकांना आता सत्य समजते, उमजते व ते प्रगटही होते, हे निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता ‘पब्लिक फर्स्ट’ हेच लक्षात ठेवणे आवश्यक आहे, यात शंका नाही. हा निकाल म्हणजे सर्वच राजकीय पक्षांना ‘ठेच’ आहे. आता ती लागली. पुढे शहाणा कोण होतो, यावरच सारे काही अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)