कार्यक्रमाअभावी ग्रामीण कलावंताची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:33+5:30

देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात सापडला असुन लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाची सर्वत्र उपासमार सुरू आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परीसराला आपण झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते. विदर्भाची खडी गंमत म्हणून फारच ही कला आजही लोकप्रिय आहे. याच भागात लोकवंताची खाण पहायला मिळते. मार्च २०२० पासुन आजतागायत लॉकडाऊन असल्यामुळे हजारो कलावंताच्या हातातील कामे गेली आहेत.

Hunger of rural artists due to lack of programs | कार्यक्रमाअभावी ग्रामीण कलावंताची उपासमार

कार्यक्रमाअभावी ग्रामीण कलावंताची उपासमार

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : अनेक कलाकारांच्या कुटुंबाचा जगण्यासाठी संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : ग्रामस्तरीय कलेचे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यासाठी तहसीलदारांना राष्टीय अमर कला निकेतनच्या वतीने निवेदन देण्यात आले. कलावंताच्या मागणीसाठी अमर कला निकेतन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच मोहाडी येथे बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे हिरालाल नंदनवार, शहादत अली सैय्यद, शेखर खडसे, प्रभाकर तेलंग,दिनेश गोविंद खडसे, यशवंत थोटे मोहाडी, राजहंस देवगडे शिवानी सुखदेवे, वैशाली रहांगडाले, माधुरी पाटील उपस्थित होते. बैठकीत शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात शाहीर मंडळीनी आपले मनोगत व्यक्त केले.
देश कोरोना व्हायरसच्या विळाख्यात सापडला असुन लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या वर्गाची सर्वत्र उपासमार सुरू आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परीसराला आपण झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.
विदर्भाची खडी गंमत म्हणून फारच ही कला आजही लोकप्रिय आहे. याच भागात लोकवंताची खाण पहायला मिळते. मार्च २०२० पासुन आजतागायत लॉकडाऊन असल्यामुळे हजारो कलावंताच्या हातातील कामे गेली आहेत.
खडी गमतीच्या माध्यमातून मनोरंजन आणि प्रबोधनाचा वसा घेतलेले कलावंत आज हवालदील झालेला आहे. तरीही ताठ मानेने, स्वाभिमानाने तो समाजात जीवन जगत आहे. अशा कलावंताना आत्मनिर्भरतेसाठी शासकीय स्तरावर आर्थिक सहकार्य केले गेले तर कलावंत खंबीरपणे जगु शकतो व समाज प्रबोधन करू शकतो. खडी गंमत कार्यक्रमाची सुरुवात गणपती उत्सवापासून सुरू होत असते. त्यामुळे शासनाने या रंगभूमीचा आणि कलावंतांचा विचार करावा, अशी मागणी झाडीपट्टी रंगाभूमीतील नाट्य कलावंतांनी शासनाकडे केली आहे.
देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी कलावंताचा सिंहाचा वाटा आहे. शासनाने विविध शासकीय योजनेतून कलावंताच्या पाठीशी उभे असणे अत्यावश्क आहे. सास्कृतिक कार्यक्रम करण्याकरीता परवानगी देण्यात यावी.
सांस्कृतिक वारसा जीवंत ठेवण्यासाठी शासनाने कलावंताच्या प्रश्नाकडे गांभीयाने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष श्रीकांत नागदिवे यांच्या पुढाकारात अंबादास नागदेवे, आर्यन नागदेवे, वैशाली रहांगडाले गराडा, माधुरी पाटील, शेखर खडसे, सुनिल खडसे, सुभाष टेकाम, यांनी मोहाडी तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी गणेश संतापे, यादवराव तुमसरे, सेवकराम खडसे, विजय गिरेपुंजे, ढेकल मेश्राम, विकास रतनपुरे, विघ्नेश्वर बावणे, रवींद्र भोयर, इसुलाल वाघाडे, राहुल मोथरकर, राजकुमार गजभिये, विकास वाघमारे, राजू कानसकर, रामकृष्णा ताडेकर, विश्वनाथ गिरडकर, रमेश बांते, मुकेश देशमुख, गोखल मने, जगदीश देव्हारे, शिवलाल राऊत, अरविंद बन्सोड, उमेश सोमेश्वर मेश्राम, विशाल शिंदे, किशोर शिंदे, देवचंद गोमासे, ज्ञानेश्वर भोयर यांची उपस्थिती होती.

Web Title: Hunger of rural artists due to lack of programs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.