शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या राजरोस वाहतुकीचे आणखी किती बळी?

By admin | Updated: May 9, 2017 00:19 IST

जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून....

प्रशासन केव्हा जागे होणार : दोन दिवसांत दोघांचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरच्या धडकेत दररोज लहानमोठे अपघात होत आहेत. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवशी रेती वाहतुकीच्या टिप्परने दोन जणांना बळी घेतला आहे. दररोज जीव जात असताना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाचे या अवैध रेती वाहतुकीकडे लक्ष जाणार की नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.भंडारा जिल्ह्यात ५३ रेती घाटांपैकी २७ रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. तांत्रिक कारणांमुळे काही रेतीघाटांचे लिलाव झालेले नाहीत. लिलाव न झालेल्या काही घाटांतून रेतीची तस्करी सुरू आहे. ज्या घाटांचे लिलाव झाले आहेत, तिथून रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरू आहे. परंतु या रेती घाटांच्या अवैध वाहतुकीला लगाम लावण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याने याचा फटका सामान्य जीवाला बसत आहे. मागील दोन दिवसात रेती वाहतुकीमुळे निष्पाप दोन जीवांचा बळी गेला. अवैध वाहतुकीमुळे आणखी किती जणांचा बळी जाईल? प्रशासनाला केव्हा जाग येईल? हा प्रश्न सामान्यजणांना पडला आहे. शनिवारला दुपारी पवनी-लाखांदूर मार्गावरील विरली येथे भरधाव टिप्परच्या धडकेत सुनिता रमेश महावाडे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चार वर्षापुर्वी तिच्या पतीचे निधन झाले आता तिची मुले पोरकी झाली आहेत. घटनेच्या दिवशी ती शेतातून गवताचा भारा आणत असताना काळाने तिच्यावर झडप घातली. त्यानंतर रविवारला दुपारी एका लग्न समारंभातून गावाकडे परतत असताना रेती वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने लाखांदूर पंचायत समितीचे माजी सदस्य देवीदास भोयर यांना धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जीवघेणी वाहतूकरेतीची वाहतूक करणारी वाहने बेधडकपणे रस्त्यावरून धावत आहेत. परिणामी अपघाताची संख्या बळावली आहे. विरली व अड्याळ मार्गावर घडलेल्या या दोन्ही घटनेतील वाहने ही रेतीची वाहतूक करणारी होती. देवीदास भोयर यांच्या अपघाताचे दृश्य मन हेलावणारे होते. संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. वाहनचालक सापडला असता तर अनर्थ घडला असता. ज्या गावाच्या हद्दीतून रेतीची वाहतूक होत आहे. त्या गावातील नागरिकांची समिती गठीत त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्याची गरज आहे. जिल्हा खनीकर्म विभागाला यावर्षी गौण खनिजांच्या माध्यमातून ५४ कोटी ११ लाखांचा महसूल मिळत असला तरी अवैध खनिजांच्या वाहतुकीमुळे बळी गेलेल्यांचा जीव अमूल्य आहे, हे प्रशासनाला सांगणार तरी कोण?