शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत निधीअभावी घरकूल लाभार्थी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 06:00 IST

केंद व राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मोहाडी येथील १४६ नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार घराच्या पायव्याचे काम पूर्ण केल्यावर पहिला हप्ता, सज्जा लेव्हलपर्यंत बांधकाम केल्यावर दुसरा हप्ता व घराच्या स्लॅब पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता, प्लास्टर व बांधकाम पूर्ण झाल्यावर शेवटच्या हप्त्याचे धनादेश दिले जातात.

ठळक मुद्देलाभार्थी चिंतेत : प्रधानमंत्री आवास योजना रखडली, केंद्र सरकारकडून निधीचा थांगपत्ता नाही

सिराज शेख।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : ‘सर्वांना घरकूल’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना निधीच्या कमतरतेमुळे मोहाडी येथे रखडली असून केंद्र शासनाचा निधी मिळालेला नसल्यामुळे अनेक घरकुल धारकांच्या अडचणीत वाढ झालेली असून त्यांनी उधारीवर घेतलेला लोहा, सिमेंट, विटा आदी बांधकाम साहित्य पुरविणारे आता पैशासाठी त्यांच्याकडे तकादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या हद्याचे ठोके वाढलेले आहेत.केंद व राज्य शासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मोहाडी येथील १४६ नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार घराच्या पायव्याचे काम पूर्ण केल्यावर पहिला हप्ता, सज्जा लेव्हलपर्यंत बांधकाम केल्यावर दुसरा हप्ता व घराच्या स्लॅब पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता, प्लास्टर व बांधकाम पूर्ण झाल्यावर शेवटच्या हप्त्याचे धनादेश दिले जातात. घरकूल बांधकाम करणारे गरीब वर्गातील असतात, त्यामुळे बांधकामासाठी ते पूर्णपणे शासनाच्या निधीवर अवलंबून असतात. बांधकाम लवकरात लवकर पूर्ण झाल्यावर आपल्याला पैसे लवकर मिळतील व उधारीचे पैसे आपण लवकर चुकते करू या आशेने सर्वच घरकुल धारकांनी युद्धपातळीवर घराचे बांधकाम पूर्ण केले.बांधकामासाठी लागणारा लोहा, सिमेंट, विटा, रेती उधारीवर आणल्या गेली. तर बांधकाम मजुरांचे पैसे देण्यासाठी काहिनी कर्जसुद्धा काढले. या आशेवर की बांधकाम पूर्ण होताच शासनाचे पैसे मिळतील आणि सर्वांचे पैसे देता येईल.परंतु मागील दोन ते तीन महिन्यापासून केंद्र शासनाचा निधी आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे घरकुल धारकांचे हप्ते अडलेले आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.केंद्राचा निधी म्हाडाकडेप्रधानमंत्री आवास योजनेचा निधी नगर पंचायतीला म्हाडाकडून उपलब्ध होतो. निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मोहाडी नगर पंचायतीतर्फे अनेकदा म्हाडाकडे पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु मागील तीन-चार महिन्यांपासून म्हाडाकडून केंद्राच्या निधी प्राप्त झालेला नाही असे नगरपंचायतीचे म्हणणे आहे.घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडले व ते दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणे त्यांना गरजेचे आहे. प्रती घरकुल २ लक्ष ५० हजार रुपये प्रमाणे मंजूर घरकुलांना देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रती घरकुल १ लक्ष रुपये, तर केंद्राकडून १ लक्ष ५० हजार रुपये दिले जातात. यासाठी राज्य शासनाकडून ५८ कोटी ४० लक्ष प्राप्त झाले आहे. मात्र केंद्र शासनाकडून निधी मिळालेला नाही.स्वत: जवळील व उसणवारी घेऊन घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. लोकांचे पैसे देणे असल्यामुळे ते पैशाचा तगादा लावत आहेत. घरकुलाचे दोन हप्ते मिळाले. नगर पंचायतीच्या दररोज चकरा मारूनही बाकीचे हप्ते मिळालेले नसल्याने उधारी साहित्य देणाऱ्यांचा तगादा वाढला आहे.-जितेंद्र हेडाऊ, घरकूल लाभार्थी, मोहाडी.घरकुलाचे हप्ते तीन महिन्यांपासून मिळालेले नसल्यामुळे व काही बांधकाम साहित्य उसणवारीवर घेतले असल्यामुळे घरकुलाचे बांधकाम नाईलाजास्तव थांबवावे लागले.-लीलाधर धार्मिक, घरकूल लाभार्थी, मोहाडी.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना