शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे आरोग्य विभाग खिळखिळे

By admin | Updated: September 29, 2014 23:00 IST

ग्रामीण तथा शहरी जनतेचे आरोग्य सुरळीत रहावे, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यात विविध संवर्गातील ११८ पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्य

भंडारा : ग्रामीण तथा शहरी जनतेचे आरोग्य सुरळीत रहावे, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरविणे हे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे. मात्र जिल्ह्यात विविध संवर्गातील ११८ पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. रिक्त पदांमुळे हा विभाग पर्यायाने 'पंगू' झाल्याची प्रचिती येत आहे.ग्रामीण व शहरी नागरिकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा कमी खर्चात पुरविण्यासाठी आरोग्य विभाग कटीबध्द आहे. ग्रामस्थांना आरोग्य सुविधा पुरविता याव्या, यासाठी शासनाने तालुकास्तरावर उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांची निर्मिती केली आहे. या केंद्रांतून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तिथे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व अन्य प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहे. नागरिकांना मोफत औषध पुरविण्याचे आदेश असले तरी, अनेक शासकीय रुग्णालयात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने रूग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून औषध घ्यावी लागते.जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील सरळसेवा व पदोन्नती संवर्गातील ११८ पदे रिक्त आहे. सरळसेवा संवर्गातील मंजूर पदांपैकी काही पदे भरण्यात आली असून अनेक पदे रिक्त आहेत. हीच स्थिती पदोन्नती संवर्गातील आहे. जिल्ह्यातील रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग २ गटातील १०८ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यातील २४ पदे रिक्त आहेत. तांत्रिक कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य सेवक, सेविका, औषधी निर्मिता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अ-वैद्यकीय पर्यवेक्षक व कुष्ठरोग तंत्रज्ञ या संवर्गातील ४९१ पदांना मंजुरी प्राप्त असून ६२ पदे अजूनही रिक्त आहेत. अतांत्रिक संवर्गातील कनिष्ठ सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी, परिचर या संवर्गातील सरळसेवेतील १७२ मंजूर पदांपैकी ७ पदे रिक्त आहेत. सफाई कामगार, वाहन चालक या संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहे. अंशकालीन महिला परिचर संवर्गातील २६ पदे रिक्त आहेत. शेकडोंच्या संख्येत रिक्त पदांच्या भरोशावर आरोग्य विभागाचे काम सुरू असून यामुळे नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यापासून वंचित रहावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)