शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोगस डॉक्टरांमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: October 26, 2014 22:36 IST

जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठा प्रमाणात वाढ झाली आहे. या बोगस डॉक्टरांच्या व्यवसायामुळे ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या

भंडारा : जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेल्या बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठा प्रमाणात वाढ झाली आहे. या बोगस डॉक्टरांच्या व्यवसायामुळे ग्रामीण परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात जनतेच्या आरोग्याशी संबंधित शासनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे अशा बोगस डॉक्टरांकडेच जनतेला उपचाराकरिता जावे लागते. राज्यात कोठेही वैद्यकीय व्यवसाय करावयाचा झाल्यास इंडियन मेडिकल असोसिएशन या संघटनेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. परंतु असे कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र नसताना बरेच बोगस डॉक्टर आपला व्यवसाय करीत आहेत. तर काही डॉक्टर शहरातील डॉक्टरांकडे कंपाऊंडर म्हणून नोकरी करुन नंतर ग्रामीण परिसरामध्ये येऊन आपला स्वत:चा व्यवसाय करीत आहेत. अशा डॉक्टरांना कोणत्या औषधीचे काय परिणाम होतात. कोणत्या औषधीवर शासनाने बंदी घातली आहे, याची त्यांना माहिती नसते. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉक्टर ग्रामीण भागात अनधिकृतपणे मूळव्याध, भगंदर यासारख्या रोगांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार करीत आहेत. काही डॉक्टर बॉम्बे मार्केटच्या दुय्यम दर्जाच्या औषधीचा वापर करुन लालसेपोटी मोठ्या प्रमाणात पैसा कमविण्याचा गोरखधंदा करीत आहेत. बऱ्याच ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर मोहीम राबविली आहे. परंतु जिल्ह्यात मात्र शासनाने बोगस डॉक्टरांना व्यवसाय करण्यासाठी मोकाट सोडल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागात शासनाच्या वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. विविध भागातील आरोग्य केंद्रामध्ये तथा उपकेंद्रामध्ये डॉक्टर, कर्मचारी तथा औषधसाठा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध राहत नाही. त्यामुळे स्थानिक परिसरातील रुग्णांना अशा प्रकारच्या बोगस डॉक्टरांकडून नाईलाजास्तव उपचार करवून घ्यावा लागतो. त्यामुळे परिसरात अवैध धंदा करणाऱ्या डॉक्टरांचा व्यवसाय फोफावत आहे. बोगस व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर तालुकानिहाय कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)