शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांना मिळणार संरक्षण

By admin | Updated: July 4, 2016 00:31 IST

२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक पद अतिरिक्त ठरत होते.

शासन निर्णय : रामनाथ मोते यांच्या प्रयत्नांना यशपुरुषोत्तम डोमळे  सानगडी२८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार ज्या शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक पद अतिरिक्त ठरत होते. त्यांचे इतर व्यवस्थापनेच्या शाळांमध्ये समायोजन न करता सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत शाळेतच संरक्षण दिले जाईल, असा शासन निर्णय २ जुलै २०१६ ला शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. राज्यातील शेकडो मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना संरक्षण मिळणार असल्याचे शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष डॉ.उल्हास फडके यांनी सांगितले.या आधीच्या निर्णयात अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकाचे समायोजन इतर व्यवस्थापनाच्या रिक्त जागेवर करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे भविष्यात अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असते. याबाबत शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना निवेदन देऊन अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक यांना सेवेत संरक्षण देण्याची मागणी केली होती. पूर्वीच्या निकषाप्रमाणे सेवा पूर्णपणे वाया जाणार होती. त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली असती. तसेच दुसऱ्या व्यवस्थापनाच्या शाळेत समायोजन केले असते तर त्या शाळेतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन कायदेशीर प्रश्न निर्माण झाले असते.या सर्व बाबीची कल्पना आमदार मोते तसेच डॉ.उल्हास फडके, अंगेश बेलपांडे यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे व शिक्षण सचिवाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. अखेर याबाबत सुधारित आदेश आढून शिक्षण विभागाने राज्यातील शेकडो अतिरिक्त मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना दिलासा मिळाला. उपरोक्त निर्देश वगळता अन्य निर्देश संदर्भातील दि. २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयातील अन्य आदेश, निकष लागू राहतील.आरटीई कायदा व २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार २८ आॅगस्ट २०१५ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या आदेशाने राज्यातील हजारो मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षक, शिक्षक अतिरिक्त झाले. मुख्याध्यापकांना कार्यरत शाळेतच सेवासमाप्तीपर्यंत राहण्याचे आदेश शासनाने काढल्यामुळे मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला होता. परंतु उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांवर अन्याय झाला होता. अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सतत शिक्षणमंत्री यांचे अनेकदा पाठपुरावा केल्यामुळे अखेर उपमुख्याध्यापक तसेच पर्यवेक्षकांना कार्यरत शाळेतच सेवानिवृत्तीपर्यंत राहण्याचे आदेश शिक्षण विभागानी काढले तसेच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन इतर शाळेत करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे.- डॉ.उल्हास फडकेविभागीय अध्यक्ष,म.रा.शिक्षक परिषद