शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकाची शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:01 IST

शाळेचे ते स्वत: संचालक आणि मुख्याध्यापकही होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत आले. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोबाईलवर बोलत ते शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील रुमकडे गेले. मात्र बराच वेळ झाला तरी महेंद्र मेश्राम खाली का आले नाही म्हणून काही शिक्षकांनी वर जाऊन पाहिले. तेव्हा ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.

ठळक मुद्देसाकोलीची घटना। खिशात सापडली चिठ्ठी

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : येथील बचपन प्ले स्कूलच्या मुख्याध्यापकाने आपल्या शाळेतच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. खिशात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये मानसिकदृष्ट्या खचल्याने आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले होते.
महेंद्र मनोहर मेश्राम (३४, रा.पळसपाणी) असे मृत मुख्याध्यापकाचे नाव आहे. पाच वर्षापूर्वी त्यांनी येथील एकोडी मार्गावर बचपन प्ले स्कूल सुरु केले होते. या शाळेचे ते स्वत: संचालक आणि मुख्याध्यापकही होते. शनिवारी सकाळी १०.३० वाजता नेहमीप्रमाणे आपल्या शाळेत आले. सर्व शिक्षकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मोबाईलवर बोलत ते शाळा इमारतीच्या वरच्या मजल्यावरील रुमकडे गेले. मात्र बराच वेळ झाला तरी महेंद्र मेश्राम खाली का आले नाही म्हणून काही शिक्षकांनी वर जाऊन पाहिले. तेव्हा ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आले.
शिक्षकांनी तात्काळ त्यांना खाली काढून साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी मृत घोषीत केले. अविवाहित असलेल्या महेंद्र मेश्राम यांच्या खिशात मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत आपण बऱ्याच दिवसांपासून मानसिकदृष्ट्या खचलो होतो. त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिलेले आहे. या घटनेची माहिती होताच अनेकांंनी साकोली उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. अविवाहित असलेल्या महेंद्र मेश्राम यांनी परिश्रमातून बचपन प्ले स्कूल साकोली येथे सुरु केले होते. मात्र अचानक त्यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास साकोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत.

शैक्षणिक क्षेत्रात खळबळ
़उच्च शिक्षित महेंद्र मेश्राम यांनी आपल्या शाळेतच गळफास लावून आत्महत्या केल्याने साकोलीच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मनमिळाऊ स्वभावाचे असलेल्या महेंद्र मेश्राम यांनी शाळा नावारुपास आणली होती. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या केली. त्यांच्या मागे आईवडील, बहिण, भाऊ असा परिवार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी त्यांचे मुळ गाव पळसपाणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यू