शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गरीबीच्या मुलामाला आनंदाची जोड

By admin | Updated: January 12, 2015 22:44 IST

‘चिंध्या अंथरूण सोने विकायला बसलो ग्राहक फिरकता फिरेना, सोने अंथरूण चिंध्या विकायला बसलो ग्राहक सरता सरेना’ या काव्यपंक्ती अलंकारीक वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा कधीकधी प्रत्यय येतो.

इंद्रपाल कटकवार - भंडारा‘चिंध्या अंथरूण सोने विकायला बसलो ग्राहक फिरकता फिरेना, सोने अंथरूण चिंध्या विकायला बसलो ग्राहक सरता सरेना’ या काव्यपंक्ती अलंकारीक वाटत असल्या तरी प्रत्यक्षात त्याचा कधीकधी प्रत्यय येतो. कष्टाचे पाणी करून दोनवेळच्या भाकरीसाठी वाटेल ते कष्ट सोसणाऱ्यांमध्ये जीवनाची तमा आणि उमेद पाहण्यासारखी आहे. एका रांगेत बसून उदंड आयुष्य विविध प्रकारची फळे विकताना त्यांनी कधी ऊन, वारा व पावसाची तमा बाळगली नाही. वितभर पोट भरून आपल्या पाल्यांना शिक्षण द्यायचे, हीच आस त्यांच्या डोळ्यात पाहायला मिळाली. भंडारा शहरातील मिस्कीन टँक तलाव रस्त्यावर एका पंक्तीने फळे विकणाऱ्या आशादायी व्यक्तींची ही छोटेखानी गाथा.मिस्कीन टँक रस्त्याच्या उजव्या हातावर सुखदास बरबरैय्या हे मागील २५ वर्षांपासून सपत्नीक फळविक्रीचा व्यवसाय करीत आहे. घरात एकूण सात सदस्य. चार मुले व एक मुलगी असा परिवाराचा भरणपोषण करण्यासाठी उदंड आयुष्य कष्टात घालविले. एकंदरीत कहार समाजातील मुले जास्त प्रमाणात शिकलेले नाही. सुखदासही अधिक शिकलेले नाही. वडिलांनी हाती दिलेला व्यवसाय अखंडपणे आजही चालवित आहेत. शरीरातील हाडे झिजून गेले असले तरी त्यांचे मन तरूणासारखे आहे. विचार प्रगतीशिल व तेवढेच आशावादी आहेत. आपल्या मुलांनाही त्यांनी आशावाद शिकविला. हरलो तरी सत्याचा मार्ग कधी सोडायचा नाही, मेहनत करावी, हा मुल मंत्र ते सगळ्यांना देतात. वयाची सत्तरी गाठत असताना त्यांच्यातला जोश वाखाणण्यासारखा आहे. वयाने थकले तरी मनाने ते थकलेले दिसत नाही. आज नैराश्यपोटी कित्येक तरूण आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. सुखदास यांना बघून कदाचित असा विचार करणाऱ्यांना आत्महत्या हा शब्दच सुचणार नाही.सुखदास यांच्यासारख्या आपल्या जीवनात गरीबीला डावलून आनंदाची गगण भरारी घेणाऱ्यांमध्ये फुलबसीया दुधबरैय्या, कमलाबाई बादशहा, रुख्मीबाई चंदनबटवे, सेवक भवरीया, श्यामराव चंदनबटवे, सुत्तम चंदनबटवे आदींची प्रामुख्याने नावे घेता येऊ शकतात.