शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. पदाधिकारी योजनांपासून अनभिज्ञ

By admin | Updated: October 14, 2015 00:40 IST

गावचा विकास करावयाचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाचे ध्येय-धोरण काय आहेत,..

प्रशिक्षणाची गरज : उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहनाची गरजमोहन भोयर तुमसर गावचा विकास करावयाचा असेल तर सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाचे ध्येय-धोरण काय आहेत, ते कसे राबवायचे यातून गावाचा विकास कसा करावयाचा याबाबत सविस्तर माहिती असणे आवश्यक आहे. परंतु, नवीन सरपंच, सदस्यांना याबाबतची माहिती नसल्याने गावाचा अपेक्षित असा विकास होऊ शकत नाही. याबाबतचे प्रशिक्षणही वेळोवेळी शासनस्तरावर सुरू असते. परंतु या प्रशिक्षणाला आवश्यक त्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाच्या योजना व गावातील आवश्यक सुधारणा यांचा समन्वय साधता आला तर गावाच्या विकासाला कोणी रोखू शकत नाही. शासनाच्या योजना गावात राबविणे आणि त्यात सहभागी होणे, शासनाच्या योजनांमध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी लाखो रुपयांचे पुरस्कारही दिले जातात. या सर्व बाबींचा योग्य वापर करून घेतल्यास गावाच्या विकासासोबतच लाखो रुपयांचे पुरस्कारही प्राप्त करता येऊ शकते.ते कसे मिळवायचे याचे नव्याने निवडून आलेल्या गावातील ग्रामसदस्य, सरपंच यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शासनाच्या योजना ग्रामसेवकाला लेखी स्वरूपात पंचायत समितीकडून देण्यात येतात. या योजनेची माहिती अनेक गावात ग्रामसभेतून दिलीच जात नाही. सरपंच सदस्य यांनासुद्धा ही माहिती पुरविली जात नाही. मोजक्याच शेतकऱ्यांना माहिती देऊन मोकळे होतात. अशी अनेक उदाहरणे ग्रामीण भागात दिसून येतात. यामुळे संपूर्ण गावाचे नुकसान होते. अनेक प्रशिक्षण, माहिती, जनजागृती आदी संबंधितांची कामे ही कृषी कार्यालय व वनविभाग कागदोपत्रीच राबवित आहेत. काही मर्जीतील लोकांनाच याबाबतची माहिती देऊन कामे उरकविली जात आहेत. त्यामुळे गाव विकासाबाबत सरपंचासह ग्रामसदस्य व गावकरी अनभिज्ञ राहतात. परिणामी गावाचा विकास होत नाही. यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यासंदर्भात काही सरपंचांसोबत संपर्क साधला असता त्यांनी प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. गावाच्या विकासासाठी नियमित प्रशिक्षण मिळाल्यास गावाचा विकास होईल असे मत काहिंनी व्यक्त केले. ग्रामविकासात चांगली कामगिरी करणाऱ्या राज्यातील गावांचा दौरा सरपंच, सदस्यांसाठी काढण्यात यावा. अशा अभ्यास दौऱ्यांचा गावांच्या विकासासाठी लाभ होईल.