शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गुटखाबंदीची अंमलबजावणी कागदोपत्रीच

By admin | Updated: October 25, 2014 01:03 IST

गुटखा व पान मसाल्याला तरुणाईसह सर्वच वयोगटातील लोकांकडून मोठी मागणी असली तरी मात्र तरुण ...

भंडारा : गुटखा व पान मसाल्याला तरुणाईसह सर्वच वयोगटातील लोकांकडून मोठी मागणी असली तरी मात्र तरुण व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन राज्य शासनाने गुटखाबंदीचा निर्णय घेतला. तरीही पानटपरीवर गुटख्याची विक्री जोमात होत आहे. त्यामुळे गुटखा विक्री विरूद्ध कारवाई कागदोपत्रीच आहे काय? असा सवाल जनता विचारू लागली आहे.गुटखाबंदीची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहेत. या बंदीसंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सुचना न आल्याने कारवाईबाबत अधिकाऱ्यात संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसत आहे. गुटखाबंदीचे व अंमलबजावणीचे अधिकार अन्न व औषध प्रशासनास दिले आहेत. बंदीचा निर्णय होऊन महिना लोटला तरी अद्याप अंमलबजावणी झाली नाही. गुटख्याच्या आहारी गेलेल्यांनी बंदी लक्षात घेऊन एकदाच पुढील तीन चार महिने पुरेल इतका साठा विकत घेऊन ठेवल्याचे किरकोळ विक्रेत्यांकडून सांगितले जाते. परंतु या साठ्याकडे कुणीही गांर्भीयाने पाहत नाही.यात दुसरा गंभीर विषय असा की, शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखू विक्री करण्यावर बंदी आहे. मात्र हा नियमही पायदळी जात आहे. बंदीनंतर सुरुवातीला गुटखा विकावा का म्हणून विक्रेतेही संभ्रमात आहेत. गुटखाबंदीची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात येते, मात्र नेहमीप्रमाणे थातुरमातुर कारवाई केली जाते. शाळा महाविद्यालयाचा आवार तसेच बसस्थानक, शासकीय कार्यालयाच्या परिसरात गुटखा विक्री बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासनाने करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. मध्यंतरी अशाच पद्धतीने गुटख्यावर बंदी आणण्याचा प्रयत्न २००२ मध्ये झाला होता. त्यावेळी कंपन्यांनी गुटखा ऐवजी पान मसाला व त्यामध्ये तंबाखू मिसळण्याची दुसरी एक पुडी तयार केली होती. या दोन पुड्या एकत्र केले की गुटखा तयार होत असल्याने त्यावेळच्या बंदीतून असा मार्ग काढला होता. या वेळेस कंपन्या कोणती नवी कल्पना लढवणार याकडे तंबाखू शौकीनांचे लक्ष आहे. (वार्ताहर)