शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरींच्या निधी रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:35 IST

तुमसर : जिल्ह्यात १५०० धडक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४१२ विहिरींच्या ...

तुमसर : जिल्ह्यात १५०० धडक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यात तुमसर व मोहाडी तालुक्यातील ४१२ विहिरींच्या समावेश आहे काही शेतकऱ्यांना प्रथम देण्यात आले परंतु नऊ ते दहा महिन्यापासून अद्याप शेतकऱ्यांना देयके मिळाली नाहीत त्यामुळे बांधकाम करण्यात आलेल्या खर्चाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात भाजपने तहसालदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

तुमसर व मोहाडी तालुक्‍यात ४१२ धडक सिंचन विहिरी शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आल्या काही शेतकऱ्यांना विहिरींच्या प्रथम देयक देण्यात आले, परंतु मागील नऊ ते दहा महिन्यांपासून उर्वरित विहिरींचा निधी देण्यात आला नाही त्यामुळे विहिरींचे बांधकाम रखडलेले आहे. बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीचा खर्च परतफेड कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झाला आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ विहिरींच्या निधी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे, डोंगरल्याचे सरपंच उमेश बघेले, बोरीचे सरपंच अविनाश उपरीकर, दीपक सरादे, अंजना सरादे, राजकिरण पटले, आशिष पारधी, अनिल पटले, दिनेश पटले, नामदेव पारधी, आकाश पारधी, संजय टेंबरे, विजय तिवारी, धर्मपाल रामटेके, देवीलाल भगत इत्यादी शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाण्याची गरज आहे. राज्य शासनाने धडक सिंचन विहीर योजना राबविण्याचे धोरण ठरविले, परंतु शासनाकडून आता निधी वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यात असंतोष व्याप्त आहे.