कामगार संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By Admin | Updated: September 4, 2016 00:34 IST2016-09-04T00:34:26+5:302016-09-04T00:34:26+5:30

सरकारच्या कामगार किसान विरोधी, जनविरोधी, मालक धार्जिण्या धोरणाविरुध्द देशव्यापी संपानिमित्त...

A front of the labor union's collector's office | कामगार संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कामगार संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

आयटकचा मोर्चा : सरकारचे कामगार किसान विरोधी धोरण
भंडारा : सरकारच्या कामगार किसान विरोधी, जनविरोधी, मालक धार्जिण्या धोरणाविरुध्द देशव्यापी संपानिमित्त भंडारा जिल्ह्यातील आयटक प्रणित संघटनांचा मोर्चा २ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
मोर्च्याचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष शिवकुमार गणवीर, जिल्हाध्यक्ष माधवराव बांते, कार्याध्यक्ष व नगरसेवक हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व आंगणवाडी युनियनच्या अध्यक्षा सविता लूटे यांनी केले.़ मोर्च्यात कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल रद्द करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, सिंचनाची सोय, कमी व्याजाने कर्ज द्या, महागाई कमी करा, राशन व्यवस्था सर्वांना लागु करा, बेरोजगारी कमी करा, रोजगार निर्मीतीवर भर द्या, कंत्राटी पध्दत बंद करा, योजना कामगारांना सरकारी नोकरीचा दर्जा द्या, १९०० रूपये किमान वेतन, सर्वांना तीन हजार रूपये पेंशन, एफडीआय रद्द करा आदी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या़ मोर्च्याचे रूपांतर सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या सभेत झाले़ त्यात आयटकच्यावतीने सदानंद इलमे, हिवराज उके, सविता लूटे व माधवराव बांते यांनी मार्गदर्शन केले़ मोर्च्यात व सभेत मोठ्या संख्येत कामगार कर्मचारी सहभागी होते़ त्यात प्रामुख्याने आयटकचे झुलनबाई नंदागवळी, गजानन पाचे, हरिदास जांगळे, ताराचंद देशमुख, वामनराव चांदेवार, राजु बडोले, मंगला गजभिये, गजानन लाडसे, रामलाल बिसने, माणिक लांबट, विद्युत फेडरेशनचे राजेश जांगडे, पी़ डी़ पवार, पोस्टल युनियनचे ए़ एस़ अवचट, टी़ एस़ लांजेवार, आ़र एस़ लिल्हारे, बी़ डी़ सोनकुसरे, हसन शेख, रत्नाकर मारवाडे, मंगेश माटे, राजु लांजेवार, भाग्यश्री उरकुडे, रूंदा मोहतुरे आदींचा समावेश होता़ (शहर प्रतिनिधी)

Web Title: A front of the labor union's collector's office