शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

रुग्णालयासमोर पोलिसांत फ्री-स्टाईल हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दृश्य पाहून नागरिक अचंबित झाले होते. एकमेकांना बुटाने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना खर्रा देण्यावरुन पोलिसांत वाद झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देभंडारातील प्रकार : आरोपींना खर्रा देण्याचा वाद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आरोपींना घेऊन गेलेल्या दोन पोलिसात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना येथील जिल्हा रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दृश्य पाहून नागरिक अचंबित झाले होते. एकमेकांना बुटाने मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींना खर्रा देण्यावरुन पोलिसांत वाद झाल्याची माहिती आहे.जिल्हा मुख्यालयातील पोलीस कर्मचारी सोमवारी सकाळी आरोपींना घेवून पोलिसांच्या वाहनाने जिल्हा रुग्णालयात पोहोचले. वैद्यकीय तपासणी आटोपून आरोपींना वाहनापर्यंत आणण्यात आले. मात्र त्यानंतर काही कळायचा आत दोन पोलीस कर्मचारी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण करु लागले. एका पोलिसाने चक्क आपल्या पायातील बुट काढून दुसऱ्याला मारला. तुंबळ हाणामारी सुरु झाली. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी या दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघेही ऐकण्याच्या मनस्थीतीत नव्हते. हा प्रकार पाहण्यासाठी रुग्णालयासमोर एकच गर्दी झाली होती. आरोपींना पोलीस मारतात, हे नेहमी चित्र पाहणाºया नागरिकांना पोलीस एकमेकांना मारत असल्याचे दिसत होते. नेमके कशावरुन या दोघात वाद झाला हे कळायला मार्ग नसला तरी आरोपींना खर्रा देण्यावरुन वाद झाल्याची माहिती आहे. एका पोलिसाने आरोपीला खर्रा दिल्याने दुसºयाने त्याला मज्जाव केला. त्यातून ही हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन व्हायरल झाला. जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचली.नागरिकांच्या संरक्षणाची आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे दोन पोलीस एकमेकांना बुटाने मारत होते. अनेकजण या मारहाणीचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करित होते. शहरात दिवसभर पोलिसांच्या हाणामारीचीच चर्चा सुरु होती. या घटनेची माहिती पोलीस दलात होताच एकच खळबळ उडाली. खर्राचे कारण असले तरी नेमके या हाणामारीमागे काय कारण आहे, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे.पोलिसांची प्रतिमा मलीन करणाºया या पोलिसांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ केली असली तरी या प्रकरणात वृत्त लिहीस्तोवर पोलिसांत तक्रार झाली नव्हती. त्यावरुनही उलटसुलट चर्चा सुरु होती. यासंदर्भात भंडारा शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण यांना विचारणा केली असता अद्याप कुणाचीही तक्रार दाखल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.मारहाण प्रकरणात चार पोलीस निलंबितभर चौकात गणेवशात हाणामारी केल्याप्रकरणी चार पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी तात्काळ निलंबित केले. विकास गायकवाड, निलेश खडसे, विष्णु खेडीकर आणि मनोज अंबादे अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत. अंबादे मोटर परिवहन विभागात तर इतर तिघे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. येथील रुग्णालयासमोर पोलिसांत झालेल्या हाणामारीचा ३० सेकंदाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला याची तात्काळ दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत चौघांनाही निलंबित केले आहे. सदर चौघेही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी घेवून गेले होते. त्याठिकाणी दोघांमध्ये गणवेशातच कर्तव्यावर असतांना हाणामारी झाली. ही घटना पोलीस दलाची जनमानसातील प्रतीमा मलीन करणारी असल्याने त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे. तसेच या घटनेची सविस्तर चौकशीही करण्यात येणार आहे.

टॅग्स :Policeपोलिस